कोपरगांव बाजार समितीमध्ये शासन आधारभुत दराने सोयाबीन खरेदी सुरू –  सभापती रोहोम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समिती मध्ये शासन आधारभुत दराने NCCF मार्फत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांचे शुभहस्ते होवून सोयाबीन शासन हमी भाव दराने रूपये 4,892/- प्रति क्विंटल ने खरेदी करण्यास सुरूवात करण्यात आली.

प्रथम शेतकरी विशाल लक्ष्म़ण धीवर रा.कोकमठाण, उत्त़म बादशहा पुणे रा. ब्राम्हणगांव यांचा सभापती  व उपसभापती यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

शासन हमी भाव योजनेच्या माध्यमातुन प्रति क्विंटल 4,892/- दर दिला जाणार आहे. सोयाबीन विक्री केल्यानंतर सात दिवसाच्या आत संबंधित शेतक-याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. शेतक-यांना एकरकमी सर्व पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतक-यांनी आपले सोयाबीन बाजार समितीच्या हमी भाव केंद्रावर विक्रीस आणुन आपला फायदा करून घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी केले आहे.

शेतक-यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन आणण्यापुर्वी ऑनलाईन नोंद करणे आवश्य़क आहे. ऑनलाईन नोंदणीकरीता सोयाबीन पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स़ व मोबाईल नंबर बाजार समितीकडे दि.15/11/2024 पर्यंत देणे आवश्य़क आहे.

बाजार समितीचे खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीस आणतांना स्व़च्छ़, काडी कचरा नसलेली, वाळलेली, 12 टक्कयाच्या आत आर्द्रता असलेली माती विरहीत सोयाबीन विक्रीस आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले. याप्रसंगी संचालक खंडु फेपाळे, प्रकाशराव गोर्डे, रामदास केकाण, साहेबराव लामखडे, सर्जेराव कदम, ऋषीकेश सांगळे, रामचंद्र साळुंके, शेतकरी बांधव उपस्थित होते.   

Leave a Reply