मोठ्या जबाबदारीसह निधीही देतो, काळेंना निवडून द्या- अजित पवार 

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव  मतदार संघातून आमदार आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या मतदार संघासाठी मोठा निधीसह काळेंना राज्याची मोठी जबाबदारी देतो हा माझा शब्द आहे असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार काळे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत नागरीकांना विंनती केली.

 कोपरगाव येथे महाराष्ट्रवादी अर्थात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे  यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी  शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले.  या सभेच्या  अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते.

यावेळी जिल्हा बॅंकेच्या माजी संचालीका चैताली काळे, डॉ. धनंजय धनवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  नितीन औताडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रविंद्र बोरावके, कोल्हे गट भाजपचे विश्वासराव महाले, धनंजय जाधव,अशोक रोहमारे, राजेंद्र जाधव, विनायक गायकवाड, मेहमुद सय्यद, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, विजय ञिभूवन, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पवार पुढे म्हणाले की,  राज्यातील महायुतीचे सरकार सर्व घटकांतील समाजासाठी विकासाचे काम करीत आहे कोणताही भेदभाव करीत नाही. कोपरगाव मतदार संघासाठी आमदार आशुतोष काळे यांना विक्रमी विकास निधी दिला आहे. आमदार काळे यांना वैयक्तिक लाभ नाही तर त्यांना जनकल्याणाच्या लाभासाठी प्रयत्न करणारे प्रामाणिक लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघाला लाभले आहेत. मागच्यावेळी काठावर विजयी केले आता विक्रमी मतांनी विजयी करा. आमदार काळे यांना आता कोल्हे परिवाराने साथ दिली आहे. कोल्हे यांनी या निवडणुकीत युतीच्या धर्म पाळल्याने त्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. 

 विरोधक लाडकी बहीण योजने बद्दल गैरसमज पसरवत आहेत. माञ तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या पुढील पाच वर्ष हि योजना अविरत सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांचे विजबिल माफ केले आहे. युवकांसाठी रोजगार निर्मिती तसेच मुलींसाठी विविध योजना सुरू केल्या त्या कधीच खंडीत होणार नाहीत अशी ग्वाही पवार यांनी देवुन आमदार काळे यांच्या कार्याचे आपल्या खास शैलीत कौतुक केले. 

यावेळी आपल्या प्रास्तविक भाषणात आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगावमध्ये चारशे एक्कर शासकीय जमीन उपलब्ध असुन तिथे नव्याने एमआयडीसी आणली तर हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. पश्चिमेकडील समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ते त्वरीत झाले तर मतदार संघातील पाटपाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटेल. मतदार संघातील दळणवळणासाठी लागणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती गतीमान सुरु आहे काही पुर्णत्वास आहूत तर काहींचे नियोजन केले आहेत.

मतदार संघाच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी भरीव निधी दिल्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी पाच वर्षात केलेल्या विकासावर दृष्टीक्षेप टाकुण भविष्यात विकास साधण्याचा आराखडा  उपस्थितांसमोर मांडला.

 यावेळी मेहमूद सय्यद, विजय वहाडणे, रविंद्र बोरावके चारुदत्त सिनगर आदींनी काळे यांच्या कार्याचा गौरव करीत  आगामी काळात काळेंना मंञी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली.  दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचार सभेला विक्रमी गर्दी झाली होती.

Leave a Reply