मतदार संघातील तुल्यबळ बहुतांश नेते, कार्यकर्ते काळेंच्या सोबत
कोपरगाव प्रतीनिधी, दि. १५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आमदार काय चमत्कार घडवतात. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले कोल्हे या निवडणुकीत काळे यांच्या सोबत महायुतीचा धर्म पाळत असल्याने ते निवडणुक न लढवता आमदार काळेंना सहकार्य करीत असल्याने काळे यांची ताकत अधिक वाढली आहे. अशातच मतदार संघातील तुल्यबळ बहुतांश नेते कार्यकर्ते काळेंच्या सोबत आहेत.
महायुतीचीसाठी कींबहुना आमदार काळेंच्या विजयासाठी प्रथमच मात्तबर एकञ आल्याचे दिसत आहे. तालुक्याचे तारणहार म्हणुन काळे – कोल्हे यांच्याकडे पाहीले जाते. मतदार संघात कोणतेही संकट आले तरी काळे-कोल्हे शिवाय भरीव मदतीला कोणीही पुढे येत नाही हा आजवरचा इतिहास आहे. दुष्काळ, महापुर,अतिवृष्टी किंवा करोनासारखे महामारीचे संकट असो मतदार संघात काळे-कोल्हे जनतेच्या मदतीला धावून येतात. संकटकाळी राजकारणातलीकडे जावून मदत करण्याची वृत्ती या दोन कुटुंबात कायम आहे.
जनतेच्या हाकेला धावणारे काळे-कोल्हे राजकारणात कायम एकमेकांविरुद्ध लढत आले परंतु यावेळी प्रथमच दोन्ही घराने एकञ येवून आशुतोष काळे यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. त्यांच्या सोबतीला गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, पुणतांबा परिसरातील नेते डॉ. धनंजय धनवटे, शेतकरी संघटनेचे नेते धनंजय जाधव यांचेही पाठबळ आशुतोष काळे यांना प्रचारात मिळत आहे.
जरी सर्वसामान्या जनतेसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अध्यात्मिक व वैद्यकीय क्षेञासह विविध ठिकाणातुन काळेंना पाठिंबा मिळत असला तरीही आमदार आशुतोष काळे व त्यांचा परिवार पायाला भिंगरी बांधल्या सारखे मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे व चैताली काळे हे संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहे. सर्व जातीधर्मातील नागरीकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी असला तरीही काळे परिवाराने प्रचारातील घेतलेली आघाडी खरी लक्ष वेधी ठरत आहे. आमदार काळे यांनी वैयक्तीक गाठीभेटी बरोबर गावनिहाय काॅर्नर सभावर चांगलाच जोर दिला आहे. गेल्या पाच वर्षात केलेला विकास आणि पुढील काळात होणाऱ्या विकासाच्या आराखड्यावर आमदार काळे जनतेकडे मतांची मागणी करीत आहेत.
आपले पती यांनी जनतेच्या कल्याणासाठी कसे उत्कृष्ट कार्य केले आणि भविष्यात मतदार संघाचा कसा कायापालट करणार हे सांगण्यासाठी चैताली काळे मतदारांपर्यंत पोहचत आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांना मानणारा स्वतंत्र वर्ग असल्याने अशोकराव काळे यांनीही भेटीगाठीवर जोर दिला आहे. काळे यांचे कार्यकर्त्ये मतदार संघ पिंजून काढत आहे.
काळे यांच्या विजयासाठी सर्वजन प्रयत्न करीत असले तरीही आमदार काळे व्यक्तीगत पातळीवर प्रचाराची खास यंञणा राबवून मतदारांपर्यंत पोहचत असल्याने मतदार संघात आमदार काळे यांची प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे. तर त्यांच्या साथीला कोल्हेसह अनेक दिग्गज असल्याने मतदार संघात नवा विक्रम होण्याची शक्यता दाट आहे. सर्व सामावेश नेता म्हणजे काळे अशी चर्चा सध्या मतदार संघात सुरु आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार राजा कोणता नवा विक्रम करतो याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.