आसाराम हुसळे यांचे निधन 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ :  तालुक्यातील गोधेगांव येथील आसाराम गमन हुसळे (७०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या संरक्षण विभागाचे कर्मचारी सुभाष हुसळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थीवावर गोधेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.

त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.