संजीवनी विद्यापीठाच्या वैष्णवी घोरपडेने घेतली लंडनची डिग्री

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील शिंगणापुर येथील कुमारी वैष्णवी भरत घोरपडे हीने युनायटेड किंगडम (लंडन) येथील कॉन्व्हेंट्री विद्यापीठातुन मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रमांत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होत डिग्री मिळविली आहे.

कुमारी वैष्णवी घोरपडे हिने संजीवनी इंजिनियरींग कॉलेज मधुन सिव्हील इंजिनियरींगची डिग्री विशेष प्राविण्यासह मिळवली. लहानपणांपासुन कुमारी वैष्णवी हिस अभ्यासाबरोबर खेळाची आवड आहे. तिने कराटे स्पर्धेत पुणे, गोवा, नेपाळ यासह विविध ठिकाणच्या स्पर्धा गाजवत अनेक बक्षिसे पटकावलेली आहे.

मुलांनी शिक्षण घेवुन मोठे व्हावे ही अपेक्षा तिचे मामा शंकरराव राजाराम शिंदे (राहुरी कृषी विद्यापीठ सेवानिवृत्त अधिकारी) यांनी बाळगली होती. त्याप्रमाणे आई सौ. प्राजक्ता भरत घोरपडे व वडील भरत एकनाथ घोरपडे यांनी आपल्या मुलांना पडेल ते कष्ट सोसत लहानाचे मोठे करत उच्च शिक्षण दिले.

तिच्या या यशाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे कार्यकारी विश्वस्थ अमित कोल्हे, इफकोचे संचालक विवेक भैय्या कोल्हे, स्वाध्याय परिवार आदींनी अभिनंदन केले आहे. कुमारी वैष्णवी ही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे टेलिफोन ऑपरेटर लक्ष्मण घोरपडे यांची पुतणी असुन तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply