इंदिरा पथ रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता त्वरीत करावा – मंगेश पाटील

उच्चभ्रूंच्या अतिक्रमण वादात शहराच्या प्रमुख रस्त्याचे काम पुन्हा रखडले

कोपरगाव प्रतिनिधी दि.१८: कोपरगाव शहरातील उपनगरांना जोडणारा व पूरस्थितीजन्य परिस्थितीत शहराशी संपर्क ठेवण्यासाठी महत्वाचा रस्ता म्हणून इंदिरा पथ या मुख्य रस्त्याचे महत्व कोपरगावच्या नागरीकांना अधिक आहे. माञ गेल्या अनेक वर्षापासुन हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. या रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या उच्चभ्रूंच्या  अतिक्रमणाने रस्ता होण्याऐवजी फक्त वादच झाला.

काही ठराविक नागरीकांच्या हट्टापोटी हजारो नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नागरीकांच्या तक्रारी, एकमेकांचे अतिक्रमण, राजकीय वरदहस्त, कायद्यावर बोट ठेवून एकमेकांकडे बोटे दाखवत इंदिरापथ रस्त्याच्या कामाला आडकाठी आणण्याचे काम याच भागातील सुज्ञ समजणाऱ्या नागरीकांनी केल्यामुळे पालीका प्रशासन इच्छा असुनही आजपर्यंत अतिक्रमण काढण्याचा ठोस निर्णय घेवू शकली नाही. सुज्ञ समणाऱ्यांनी मोठे मन दाखवून जनहीतासाठी केलेले अतिक्रमण काढले नाही.

उलट आमचे अतिक्रमण नाहीच हा पविञा घेवून त्यापेक्षा अधिक वाढीव नव्याने बांधकाम रस्त्यावर करुन आमचे कोणीच काही करणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला की काय असा संशय नागरीकांना येतोय. रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने खराब झालेल्या रस्त्यावरुन जाताना नागरीकांची व शाळकरी मुलांची हाल बेहाल होत आहे. अखेर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधले असुन नागरीकांच्या मनातील भाव मंगेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञात व्यक्त केले आहे.

ते आपल्या पञकात म्हणाले की, शहरातील खंदकनाला, बस स्टँडचा मुख्य रस्त्याप्रमाणे प्रमाणे सर्वात जास्त रहदारीचा असणारा रस्ता म्हणजे छञपती संभाजी महाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा आहे. या रस्त्याचे रूंदीकरण  व मजबुती करण करुन डांबरी करणासाठी पालीकेकडे मुबलक निधी असूनही रस्त्याच्या कामात दिरंगाई होते तसेच योग्य दर्जाचे काम होत नाही. अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. 

तात्काळ इंदिरा पथ रस्त्याच्या कडेचे वादग्रस्त अतिक्रमण काढून रस्त्याचे काम पूर्ण करावे. या मुख्य रस्त्यावरून, शाळा, हॉस्पिटल, धान्यमार्केटसाठी, तसेच शहरालगतच्या उपनगरातील लोकांना रहदारीसाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तेव्हा या रस्त्याचे काम गतीमान करावे. पालीका प्रशासन या कामात दिरंगाई करु नये.  निधी असला तरी दर्जाहीन व वेळेत काम पूर्ण न करणे हे जणुकाही नगरपालिकेचे ब्रीद वाक्य झाले आहे का असा सवाल केला आहे.

सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात कोणाला काय मोठेपणा मिळतोय आणि पालीकेला यात कसला मोठेपणा वाटतोय? जनहिताचे कामे चालु करा म्हणुन जनतेला सांगण्याची वेळ येते हे कोपरगावकरांचे दुर्दैव आहे. याचा अर्थ सर्व सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाचे पालीका प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही असा होतो. सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. उखडलेल्या रस्त्यामुळे खडीचा व धुळीच्या ञासाने नागरीकांचा श्वास गुदमरतोय. अतिधुळीचा परिणाम लहान मुले ते जेष्ठ नागरिक यांना होतोय.  रस्त्याच्या खडी वरून वाहनधारक घसरून पडत आहेत, खडी उडून लोकांना लागते. गोकुळनगरीच्या पुलाचे काम यापुर्वीच झाले माञ पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता डांबरीकरणं न करता तसाच सोडून दिला होता.

तसेच गोकुळनगरीच्या वळणावर रस्ता खूप छोटा झाला असून त्या ठिकाणच्या  खड्ड्यात असणारा विचित्र गतिरोधकातून गाड्या चालवणे कठीण झाले आहे. टाकळी नाका ते कोळपेवाडी पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यांवर खूप मोठे खड्डे झाले असल्याने धुळेचे साम्राज्य पसरले आहे. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने इंदिरा पथच्या रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करावे काम पुर्ण करताना रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढून अपेक्षित रुंदी वाढवून दर्जेदार रस्ता करावा अशीही मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

 नगरपालीका प्रशासनाने इंदिरा पथ रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यालगतच्या मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली. पण बड्या लोकांचे अतिक्रमण काढू शकले नाही. रस्त्यावर घराच्या संरक्षण भिंती बांधल्या आता पुन्हा  अतिक्रमणाची परिसिमा पार करण्याचे महान कार्य सुशिक्षित समजणारे करीत असतील तर शहराच्या विकासाला चालना कशी मिळणार?