शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्य भाजपचे गटनेते पदी निवड झाल्याबद्दल व मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजीराव दहातोंडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना बजरंगबली हनुमान मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांशी बोलताना दहातोंडे म्हंणाले, महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रगण्य राज्य असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही गौरवाची बाब आहे. राज्याचा गाडा चालवताना बजरंग बलीची शक्ती त्यांच्या पाठीशी आशिर्वाद रुपी आसावी म्हणून त्यांना ही मूर्ती भेट दिली आहे.
आपले मित्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री होत असल्यामुळे त्यांनी मुंबई येथे जाऊन सदिच्छा भेट घेऊन फडणवीस यांना बजरंगबलीची मूर्ती भेट देऊन शुभेच्छा दिल्या.