संजीवनीच्या तीस विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनाची नोकरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तिस विद्यार्थ्यांची अंबर एंटरप्रायझेस इंडीया लिमीटेड या कंपनीने आकर्षक वेतन देऊन नोकरीसाठी निवड केली. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना हि सुवर्णसंधी मिळाली.   निवड झालेल्या विद्यार्थ्यांत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ११, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या १०, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ०८ व एमबीए विभागाच्या ०१ अशा  एकुण ३० प्रज्ञावंतांचा समावेश  आहे.

मागील वर्षी  देखील या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन देऊन नोकरीची संधी दिली होती. त्यांनी कंपनीच्या नियमाप्रमाणे उत्कृष्ट  जबाबदारी सांभाळत कंपनीची मर्जी संपादन केली. त्यातून संजीवनी बाबत कंपनी व्यवस्थापनाला विश्वास निर्माण झाला. त्याची परीणीती म्हणून यंदा संजीवनीच्या  तब्बल ३० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. अशा प्रकारे चालू शॅक्षणि वर्षाची दमदार सुरुवात झाली आहे.

   यात मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या किरण बाळासाहेब गर्जे, राहुल संजय घुले, ऋतुजा शंकरगिर  घुगे, प्रणव विजय जाधव, यश  क्रिष्णा कदम, पायल दिपलाल राजपुत, साक्षी गोरक्ष शिंदे शुभम  अनिल कांबळे, ऐश्वर्या शंकर  सोमवंशी , विनित मनोज गुंजाळ, ओम अर्जुन वाघमोडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचे समिक्षा चांगदेव आजगे, गौर बाळू चिंधे, गौरव संदिप इलग, तेजस सतिश काळे, कार्तिकी शांताराम  खताळ, हर्षदा  नानासाहेब कोळपे, अमित किरण माळी, रेणुका अर्जुन पाटोळे, साक्षी भिवसेन पवार, अभिषेक संतोष  गव्हाणे,

मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या करण संजय गायकवाड, शुभम  रिनाकांत कबाडी, सर्वेश  सुनिल मंडलिक, इर्फाण मकबुल न्हावकर, श्रेयश  संजय रोहम, साक्षी संतोष  साखरे, पवन सुरेश  घुले आणि एमबीएच्या मयुरी भगवान भोंगळ यांचा समावेश  आहे. संजीवनी शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, विभाग प्रमुख डॉ. आर. ए. कापगते, डॉ. पी.एम. पटारे व प्रा. धनंजय कुंभार आदि उपस्थित होते.

मी कोळपेवाडी येथिल रहिवासी असुन माझे वडील शेती करतात. संजीवनीत करिअर घडते असा आई वडीलांना विश्वास होता. संजीनी इंजिनिअरींग काॅलेज ऑटोनॉमस असल्याने उद्योग जगताला हवा असलेला अभ्यासक्रम येथे शिकवीला जातो. मी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगला प्रवेश घेतला.  मला कॉलेजमार्फतच एका कंपनीमध्ये दोन महिन्यांची इंटर्नशिप  करण्याची परवानगी मिळाली. तेथे मला पावर बीआय या सॉफ्टवेअरचा वापर करून काम करण्याची संधी मिळाली. तसेच आमच्या विभागाने वेळोवेळी इंडस्ट्री एक्सपर्टची वेळोवेळी व्याख्याने आयोजित केली. त्यातून माझी जडणघडण झाली. अंबर एंटरप्रायझेस या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली. आई वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले. –हर्षदा  कोळपे (विद्यार्थीनी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, कोपरगाव )
 

Leave a Reply