माजी आमदारांना काळे झेंडे दाखवून ग्रामस्थांनी व्यक्त केला निषेध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : २०१८ साली कोळगाव थडीच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मा.आ.अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ५२.६४ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचे परस्पर उदघाटन करण्यासाठी मा.आ.स्नेहलता कोल्हे आल्या असता त्यांना कोळगाव थडी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे मंगळवार (दि.१८) रोजी झाली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत मंजूर करून आणलेल्या २० लाख निधीतून उभ्या राहीलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आ.स्नेहलता कोल्हे आल्या असता त्यांना सोनारी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे.

कोपरगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती बरोबरच सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत आ.आशुतोष काळे यांनी २०२१-२२ साली २० लाख रुपये निधी दिला होता. या २० लाख निधीतून पूर्ण झालेल्या इमारतीच्या कामात स्वत:चे कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना मा. आ. कोल्हे यांनी उद्घाटन करण्यासाठी आल्या असता त्यांना सोनारी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

यावेळी  यशस्वी प्रयत्न केला असता मा.सरपंच वसंत सांगळे, मा.उपसरपंच बाळकृष्ण कुटे, ग्रा.सदस्य चांगदेव घुगे, शांताराम सांगळे, विनोद कुटे, भाऊसाहेब सांगळे, भारत घुगे, रवींद्र सांगळे, मोहन सोनवणे, विठ्ठल घुगे,बाबासाहेब केकाण, संजय आघाव, नंदू सोनवणे, संतोष गायकवाड, बाळासाहेब सांगळे, बाळासाहेब आघाव, बाळकृष्ण आघाव आदी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे.

चाळीस वर्षात सर्वप्रकारची सत्ता असतांना कोल्हेंनी सोनारी गावाच्या विकासाकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे सोनारी गावाच्या विकासाच्या अनेक समस्या होत्या. या समस्या दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ६ कोटी ६९ लक्ष रुपये निधीतून सोनारी ते टाकळी रस्ता, २ कोटी ३९ लक्ष रुपये निधीतून सोनारी ते रवंदे रस्ता, २५ लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ५ ते इजीमा २१६ सहाचारी रस्ता (ग्रा.मा. १४) असे चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला असून काही रस्त्याची कामे पूर्ण झालीआहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी साठी देखील २० लाख रुपये निधी दिला होता. त्यामुळे या नूतन इमारतीचे उद्घाटन देखील आ. आशुतोष काळे यांच्याच हस्ते व्हावे अशी सोनारी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात आघाडीवर असणाऱ्या मा.आ. कोल्हे यांनी श्रेय घेण्यासाठी उद्घाटन केले असले तरी त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले असून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत.

मागील सहा वर्षात कोपरगाव मतदार संघात झालेली विकासकामे त्या चाळीस वर्षात सुद्धा झाली नाही याचे शल्य असणाऱ्या कोल्हेंनी नेहमीच आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आरडाओरड करत आहे. दुसरीकडे मात्र आ.आशुतोष काळेंनी आणलेल्या निधीतून झालेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी सर्वांच्या पुढे राहायचे हि कोल्हेंची नेहमीच दुतोंडी भूमिका राहिली आहे मात्र जनता त्यांना आता फसणार नाही. – सोमनाथ घुगे (ग्रा.प.सदस्य सोनारी)

Leave a Reply