कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर यंदाचे हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या सर्व कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना गोळया औषधांचे वाटप करण्यांत आले तर महिला कामगारांना मोफत सॅनिटरी पॅडचेही वाटप करण्यात आले.

प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. मुख्य शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी प्रास्तविक करतांना म्हणांले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी आवश्यक भौतिक सोयी सुविधा कारखान्याच्या कार्यस्थळावर अलब्ध करून दिल्या असुन त्यांच्यासाठी पिण्यांचे पाणी, वापरावयाचे पाणी, ऊसतोडणी कामगाराकडे असलेले पशुधनाची पशुवैद्यकिय अधिका-यांकडुन तपासणी करून लम्पी सदृष्य लसीकरण केले जात आहे. उप मुख्य शेतकी अधिकारी सी. एन. वल्टे यांनी स्वागत केले.

वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, ऊसतोडणी कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवुन नियमीत शारीरीक स्वच्छता ठेवावी. साथींच्या आजाराचे उच्चाटन करण्यांसाठी नियमीत तात्काळ गोळया औषधे घ्यावीत. लहान मुलांमधील अॅनिमिया, जंत, आदिबाबत घ्यावयाची काळजी रक्तवाढीसाठी उपाययोजना, ज्या महिला गर्भवती ऊसतोडणी कामगार आहेत त्यांनी वेळच्या वेळी नियमीत आरोग्य तपासणी करावी, आहार वेळेवर घ्यावा, थंडी गारठयापासुन स्वतःचा बचाव, त्यांच्या व होणा-या बाळासाठी पोषक आहार किती महत्वाचा आहे व तो कसा घ्यावयाचा आदिबाबत सखोल मार्गदर्शन करत त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासणीही यावेळी करून त्यांना मोफत पोषक आहाराचेही वितरण करण्यांत आले.

याप्रसंगी कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, कारखान्याचे वैद्यकिय पथक, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी कामगार, खातेप्रमुख, उप खातेप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते. सुत्रसंचलन व आभार नानासाहेब होन यांनी मानले.


