निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव नगरपालीकेच्या रणांगणात चार पक्षासह अपक्षांनी ताकत लावली आहे. आमदार आशुतोष काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे भरत मोरे, सपना मोरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. चहुबाजूंनी सर्वांनी ताकत लावून विजय खेचण्याचा प्रयत्न सुरु कूला आहे. आज निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. 

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार  व त्यांचे निवडणूक चिन्ह पुढील प्रमाणे  १) ओमप्रकाश दादाप्पा कोयटे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ) २) पराग शिवाजी संधान ( भाजप -कमळ) ३) राजेंद्र मुरलीधर झावरे ( शिंदे शिवसेना – धनुष्यबाण)  ४) सपना भरत मोरे (उबाठा शिवसेना- मशाल) ५)विजय सुर्यभान  वहाडणे (अपक्ष – बॅट) ६) रहिमुन्निसा राजमहम्मंद कुरेशी ( अपक्ष -ट्रक) ७) योगेश प्रभाकर वाणी (अपक्ष -नारळ) 

 हे ७ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन अपक्ष पदाचे उमेदवार दिपक बबनराव वाजे यांनी काल माघार घेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांची उमेदवारी बाद झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रभाग क्रमांक ४ ब मधील भाजपचे उमेदवार अतुल धनालाल काले  यांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्याने आता कोल्हे गटाकडून आकाश बबनराव वाजे यांना पुरस्कृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे.

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षासह नगरसेवकांसाठी निवडणूक चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात घोषित केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी चिन्ह वाटप जाहीर केले. त्यात नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांना पुन्हा बॅट मिळाली तर संबधीत पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. तसेच नगरसेवकांना पक्ष निहाय चिन्ह मिळाले तर अपक्षांना प्रथम पसंतीनुसार चिन्ह मिळाले आहेत. 

प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेले चिन्ह तसेच एकमेंका विरूध्दची लढाई  पुढील प्रमाणे अशी आहे.  प्रभाग क्र. १(अ) सर्वसाधारण  महीला –  सोनाली संदीप कपिले( राष्ट्रवादी काँग्रेस -घड्याळ), दिपा वैभव गिरमे  (भाजप -कमळ ) , स्नेहा जनार्दन गायकवाड (शिंदे शिवसेना – धनुष्यबाण)  १(ब) सर्वसाधारण – वैभव सुधाकर आढाव (भाजप -कमळ), दादा रखमाजी आवारे (शिंदे शिवसेना -धनुष्यबाण), सचिन शरदराव गवारे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस -घड्याळ ).  प्रभाग क्र. २ (अ ) अनुसूचित जाती – राहुल उत्तम खरात (भाजप – कमळ ), राहुल चंद्रहास शिरसाठ (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), संदीप तुकाराम निरभवणे (अपक्ष – शिट्टी), योगेश छबुलाल पवार ( शिंदे शिवसेना – धनुष्यबाण).  २(ब) सर्वसाधारण  महीला – स्मिता शैलेश साबळे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), स्वाती दिपक जपे ( भाजप – कमळ) फमिदा हसम शेख ( शिवसेना – धनुष्यबाण) , संगीता श्रीनिवास पवार ( शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस – तुतारी), न्याजोबी सरदारखाॅं पठाण (अपक्ष – कपबशी).

प्रभाग क्र. ३(अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – निर्मला सोमनाथ आढाव ( राष्ट्रवादी – घड्याळ), पल्लवी गुरमीत सिंग डडियाल ( भाजप – कमळ), ३(ब) सर्वसाधारण – जनार्दन सुधाकर कदम (राष्ट्रवादी -घड्याळ), मयुर विजय गायकवाड  (भाजप -कमळ) आदित्य रवींद्र गरुड ( शिवसेना – धनुष्यबाण),  सुधाकर बाबुराव नरोडे ( अपक्ष -किटली). प्रभाग क्र. ४ (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला –  संजना संजय उदावंत ( भाजप -कमळ), रंजना रमेश गवळी( राष्ट्रवादी -घड्याळ) मंदा पिराजी साळुंखे ( शिवसेना – धनुष्यबाण). ४(ब) सर्वसाधारण –  हनुमंत पांडुरंग नरोडे ( राष्ट्रवादी-घड्याळ), भरत आसाराम मोरे (उबाठा शिवसेना – मशाल), आकाश बबनराव वाजे ( कोल्हे गट पुरस्कृत – कपबशी),  अतिश सतिश  शिंदे (अपक्ष – कीटली), सुनील आसाराम साळुंखे(शिवसेना -धनुष्यबाण ) 

 प्रभाग क्र. ५ ( अ) अनुसूचित जमाती – अमित चंद्रकांत आगलावे (राष्ट्रवादी-घड्याळ),  संतोष माधव शिंदे(भाजप-कमळ). ५ ( ब) सर्वसाधारण महीला – वैशाली विजय वाजे (भाजप -कमळ), अर्चना विनोद गलांडे (शिवसेना – धनुष्यबाण), शोभा अशोक घायतडकर (राष्ट्रवादी काँग्रेस -घड्याळ), प्रियंका किरण थोरात (अपक्ष वहाडणे – बॅट). प्रभाग क्र. ६ (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला-  सुनिता सुनील खैरनार (शिवसेना उबाठा -मशाल), सारिका सुनील फंड (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), पद्मावती योगेश बागुल लोकसेवा आघाडी कोल्हे – छञी). ६ ( ब) सर्वसाधारण – विक्रमाआदित्य संजय सातभाई (लोकसेवा आघाडी कोल्हे – छञी ), संदीप रामदास डुबरे (शिवसेना- धनुष्यबाण), मुकुंद रामेश्वर भुतडा (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), सलीम बनेमियाॅं शेख ( अपक्ष – बॅट), संदीप मोतीराम शेवाळे ( शिवसेना उबाठा- मशाल). प्रभाग क्र. ७ (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग –  प्रसाद रघुनाथ बाळासाहेब आढाव ( भाजप -कमळ), प्रतिभा सुनील शिलेदार ( राष्ट्रवादी काँग्रेस-घड्याळ), प्रसाद दिलीप सारंगधर ( शिवसेना – धनुष्यबाण). ७ (ब) सर्वसाधारण महीला – गौरी मंदार पहाडे (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), सोनल अमोल अजमेरे ( भाजप -कमळ), मोनिका प्रशांत कोपरे (शिवसेना  उबाठा – मशाल), काजल विशाल खरात(शिवसेना शिंदे – धनुष्यबाण)

प्रभाग क्र. ८ (अ) अनुसूचित जाती महीला – मनिषा दत्तू पगारे ( भाजप -कमळ) , विमल भगवान मरसाळे ( राष्ट्रवादी काँग्रेस -घड्याळ),  वर्षा प्रफुल शिंगाडे (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), वैशाली शुभम शिंदे (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस – तुतारी),  सुनंदा माधव ञिभुवण- (बसपा -हत्ती) सुनिता सुरेश चंदनशिव – (अपक्ष – कपबशी), अर्चना सुखदेव जाधव (अपक्ष -अॅटोरिक्षा) ८( ब) सर्वसाधारण –   इम्तियाज रफिक अत्तार ( राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), किशोर बाबुराव काळे, ( शिवसेना  शिंदे – धनुष्यबाण ), खालिक जमालबाई कुरेशी ( शरद पवार राष्ट्रवादी- तुतारी),  आरिफ करीम कुरेशी ( भाजप – कमळ),  हैदर हमीद पठाण ( अपक्ष – गॅस सिलिंडर), अर्जुन रघुनाथ मोरे( अपक्ष -हिरा ). प्रभाग क्र. ९  (अ) अनुसूचित जाती – जितेंद्र चंद्रकांत रणशुर (भाजप -कमळ), सागर निंबा आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस-घड्याळ), सिद्धेश शरद खरात (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण ),  राजेंद्र जयदेव खंडीझोड (अपक्ष- बॅट), मधुकर विश्राम पवार ( शिवसेना उबाठा – मशाल ), ९ ( ब) सर्वसाधारण महीला – लक्ष्मीबाई माधव आढाव (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), विजया संदीप देवकर (भाजप -कमळ),अंजना गंगाधर फडे (राष्ट्रवादी काँग्रेस -घड्याळ), भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे( अपक्ष – लॅपटॉप ), बिना विजय भगत (शिवसेना उबाठा- मशाल ), शमा आयुब शेख (अपक्ष -अंगठी).

 प्रभाग क्र. १० (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग – रवींद्र दत्तात्रय कथले ( लोकसेवा आघाडी कोल्हे – छञी), डॉ.तुषार दादासाहेब गलांडे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ)  १० (ब) सर्वसाधारण महीला – वृषाली गणेश आढाव (भाजप- कमळ), श्रेया श्रीपाद भसाळे (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), माधवी राजेंद्र वाघचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ). प्रभाग क्र. ११ (अ) अनुसूचित जाती महीला -सोनम अरूण ञिभुवण ( राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), उषा सोमनाथ म्हस्के (भाजप -कमळ), अंजना संजीव कांबळे ( शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), संगिता गुलाब भालेराव ( शिवसेना उबाठा- मशाल),  स्वाती संतोष आरणे( अपक्ष – छञी).   ११ ( ब) सर्वसाधारण  – योगेश वसंत उशीर (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), प्रशांत बाळासाहेब कडू (भाजप – कमळ), शुभम कैलास काळे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), आसिफ मेहमूद पठाण (बसपा- हत्ती), राजेंद्र श्रावण लोखंडे (अपक्ष – बॅट), योगेश छबुराव शिंदे( शिवसेना उबाठा- मशाल ),शरफुद्दीन शमशुद्दीन सय्यद ( अपक्ष -अॅटो रिक्षा)

 प्रभाग क्र. १२ (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला – विजया मीनानाथ आंग्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), सविता कैलास मंजुळ ( भाजप – कमळ),  रहमुनिस्सा राज महमद कुरेशी (अपक्ष – बॅट), जयश्री मीनानाथ चव्हाण (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), भारती शामकांत शिंपी( बसपा-हत्ती), सुम्मेया इरफान शेख (अपक्ष – शिट्टी).  १२ (ब) सर्वसाधारण – अक्षय गणेश जाधव (शिवसेना  शिंदे – धनुष्यबाण),योगेश बन्सीलाल मोरे (शिवसेना उबाठा – मशाल ), सनी रमेश वाघ ( लोकसेवा आघाडी  कोल्हे – छञी ),  हाजीमेहमुद  मनवरभाई सय्यद  (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ).  प्रभाग क्र. १३ (अ)नागरीकांचा मागास प्रवर्ग – शिवाजी आनंदा खांडेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस  – घड्याळ), जफर शफी पिंजारी (अपक्ष – छञी), आकाश भास्कर पंडोरे (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), स्वप्निल दिलीप मंजुळ भाएप – कमळ).  १३ (ब) सर्वसाधारण महीला – जुलेखा मेहबूब पठाण(बसपा – हत्ती ), नीलफर फिरोज खान पठाण ( भाजप – कमळ), प्रतिभा सुरेंद्र बेलदार (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), शेख हिनाकौसर मुक्तार (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ 

 प्रभाग क्र. १४ (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग -शंकर वसंतराव गंगुले (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), अविनाश कैलास पाठक( भाजप – कमळ), इकबाल गनी बागवान शरद पवार राष्ट्रवादी – तुतारी), वाल्मीक जयसिंग लहिरे( राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ). १४ (ब) – विद्या राजेंद्र सोनवणे (भाजप – कमळ),  माधुरी मच्छिंद्र शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), यास्मिन गनी बागवान ( शरद पवार राष्ट्रवादी- तुतारी), परीगाबाई सुनील राठोड (शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), सविता अशोक लांडगे (अपक्ष – अॅटोरिक्षा).  प्रभाग क्र. १५ (अ)  अनुसूचित जाती महिला – सुरेखा विनोद राक्षे ( भाजप – कमळ), स्वप्नाली वैभव कानडे( राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ) वंदना लक्ष्मण साबळे ( शिवसेना उबाठा – मशाल).  १५ (ब) सर्वसाधारण  – अनिल विनायक आव्हाड ( लोकसेवा आघाडी कोल्हे –  छञी), विनोद साहेबराव नाईकवाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), 

वैभव बाबासाहेब चव्हाण ( शिवसेना शिंदे – धनुष्यबाण), साहिल रामचंद्र लकारे (अपक्ष – छताचा पंखा), गगन अनिल हाडा (शिवसेना  उबाठा – मशाल) हे उमेदवार एकमेंकच्या विरोधात उतरले असुन अजित पवार अर्थात काळे गटाकढून व भाजप मिञ पक्षाकडून १५ प्रभागात ३० उमेदवार उभे केले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी काळे गटाकडून काका कोयटे, भाजप मिञ पक्षाकडून पराग संधान यांच्यात जरी तुल्यबळ लढत वाटत असली तरी उबाठा शिवसेनेच्या सपना मोरे, शिंदे शिवसेनेचे राजेंद्र झावरे, अपक्ष विजय वहाडणे, योगेश वाणी व रहिमुलीसा कुरेशी हे कोणता चमत्कार घडवतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काळे कोल्हेंच्या विरोधात तसेच एकमेकांविरुद्ध दोन्ही शिवसेना मोठ्या ताकतीने उतरली आहे त्यामुळे २ तारखेला किती मतात रुपांतर होते हे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply