राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना स्वतंत्र दालन द्या – गटनेत्या गौरी पहाडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकूण ११ व स्वीकृत ०१ असे एकूण १२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या कामकाज संदर्भात व कोपरगाव शहराच्या विकासाबाबत विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात गटनेते व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका गौरी पहाडे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात गौरी पहाडे यांनी असे म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या दररोजचे कामकाज तसेच कोपरगांव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक नियमितपणे कोपरगाव पालिकेत उपस्थित राहणार आहे. तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व प्रत्येक प्रभागातील होणाऱ्या विकास कामांची माहिती नागरीकांना सविस्तरपणे देवून त्यांच्या सर्व तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे.

त्यासाठी गटनेत्या व  सर्व नगरसेवकांना स्वतंत्र दालनाची आवश्यकता आहे. त्यासाठी  कोपरगांव नगरपरिषद कार्यालयात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देवून सहकार्य करावे असे पहाडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply