उखाड्याने हैराण झालेल्यांना पावसामुळे मिळाला गारवा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यात दुपार नंतर ढगाळ वातावरणामुळे मोठा पाऊस होईल असे वाटत होते. आकाशात ढग दाटून आले पण अपेक्षित पाऊस आला नसला तरी. हलक्या सरी कोसळल्या. ऐन हिवाळ्यामध्ये उष्णतेने व्याकुळ झालेल्या कोपरगाव तालुक्यातील नगरीकांना थोडा गारवा मिळाला.

परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांमध्ये थोडा जीव येईल अशी आशा बळीराजाला आहे, पण गेल्या अनेक महीण्यापासुन पावसाने दडी मारल्याने बळीराजा हताश झाला आहे. आजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत सर्वजन आहेत. शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्याने सर्वांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती पण आजुनतरी अपेक्षित पाऊस आला नसल्याने सर्वांचे डोळे मेघराजाकडे लागले आहेत. मनासारखा पाऊस झाला नसला तरी शहरातील रस्त्यावरील धूळ शांत करण्याचे काम पावसामुळे झाले आहे.


