जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने दिला ९ % टक्के लाभांश – रमेश गोरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सन २०२२/२३ या वर्षासाठी ९ % लाभांश दिला असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर इतिहासात प्रथमच काही क्षणात सभासदांना लाभांश जमा झाल्याचे संदेश सर्वाना प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे संचालक रमेश गोरे यांनी येथे दिली.

जिल्ह्याचे नेते बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, ऐक्य मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, मुकेश गडदे, एकल मंचचे एल. पी. नरसाळे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते यांच्या मर्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, व्हा. चेअरमन कैलास सारोक्ते, सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप मुरदारे संस्थेचा कारभार योग्य व पारदर्शक पद्धतीने करत आहेत. असे सांगून त्यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती ही दिली. तसेच कर्ज मर्यादा ३ लाखांनी वाढ करून कर्ज व्याजदर ०.१० टक्याने कमी केल्याचे सांगितले.

यावेळी विश्वस्त दत्तु फुंदे, मुख्याध्यापक सखाराम सातपुते, सुभाष घुले, निवृती गोरे, नानाभाऊ शिंदे, बलभीम मुखेकर, कनलाल जवरे, बशीर शेख, गोरक्षनाथ दुसुंगे, वसीम पठाण, ऐक्य मंडळाचे सुखदेव डेंगळे, विलास लवांडे, नामदेव धायतडक, राजकुमार शहाणे, दिलिप दहिफळे, शिक्षक भारतीचे संदीप कातकडे, बाबासाहेब विखे, हरिभाऊ विखे, भाऊसाहेब माळवदे, परिवर्तन मंडळाचे प्रविण मगर आदिंसह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ ढोले, मनोहर बटुळे यांनी केले, आभार सुनिल खैरे यांनी मानले.