कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव आगाराच्या भंगार झालेल्या, निकामी नादूरुस्त बसमध्ये प्रवाशी घेवून प्रवास करायला भाग पाडून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या एसटी महामंडळवर कायदेशीर कारवाई नियमित बेजबाबदारपणे आगारात काम करणाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे आहे. कारण कोपरगाव आगाराच्या गाड्या गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यात बंद पडणे नित्याचे झाले आहे.

सोमवारी बाजारचा दिवस असताना दुपारी दिड वाजता कोपरगाव वरून खोपडी येथे प्रवाशी घेवून जाणारी बस क्र. एम एच ४० वाय ५४७० हि बस कोपरगाव बस स्थानकातुन प्रवाशी घेवून रस्त्याला लागली आणि काही क्षणात बसस्थानक पासून हाकेच्या अंतरावर भररस्त्यात रहदारीच्या ठिकाणी बंद पडली. चालकाने विविध प्रकारे बस चालु करण्याचा प्रयत्न केला माञ बस काही चालु होईना अखेर चालकाने आगारात संबधीत यंञणेला कळवून पर्यायी बस देण्याची विनंती केली त्यानंतर दुसरी बस देवून प्रवाशांचा प्रवास सुरु झाली.

अशी बस बंद पडण्याची हि पहीली वेळ नाही तर अनेकवेळा आगारातुन बस बाहेर काढल्यानंतर काही अंतरावर बंद पडून प्रवाशांची हालबेहाल करण्यात आगार प्रमुख बनकर यांच्यासह इतरांना कोणता आनंद मिळतोय की, एसटी महामंडळाने जाणुनबुजून प्रवाशांची गैरसोय होवू त्यांच्या जीवाला धोका निर्माण करीत मोठी एखादी दुर्घटना होण्याची वाट पहात आहेत. कोपरगाव बसस्थानकाच्या बाहेर बस निघाल्या निघाल्या कशी बंद पडते. एकच घटना पुन्हा पुन्हा होते यावर संपूर्ण यंञणा एसटी महामंडळाची यंञणा नेकमी काय काम करत असते.

आगारातून बस बाहेर निघण्यापूर्वी संपूर्ण तपासणी करून चालक वाहकाच्या ताब्यात दिली जाते. जो चालक व वाहक आगोदर संबधीत बस घेवून गेला असेल तर त्याला प्रवासादरम्यान काही बिघाड अथवा संशयास्पद वाटले तर रितसर आगाराला लेखी व तोंडी कळवले जाते इतकी चोख व्यवस्था असुनही कोपरगाव आगाराच्या गाड्या भर रस्त्यात सर्वाधिक बंद का पडतात.

आगार प्रमुख नेमकं काय करतात. आगार प्रमुख कोणता आसुरी आनंद घेत आहेत. आगार प्रमुख एर कर्तव्यदक्ष आहेत तर बस वारंवार का बंद पडतात? आगार प्रमुखाची जबाबदारी आहे की, आपल्या आगारातील संपूर्ण व्यवस्था करणं, काही उणीवा असतील तर वरिष्ठांच्या आदेशाने भरून काढणं पण आगार प्रमुख अमोल बनकर हे कायम वादग्रस्त ठरत आहेत. त्यांची काम करण्याची पध्दत प्रवाशांच्या जीवावर बेतणारी. आसुरी आनंद घेणारी ठरत आहे.

दरम्यान गेल्या पंधरा दिवसापुर्वी तालुक्यातील काकडी येथे एका बसमधून शाळकरी मुलगी बसची खिडकी तुटल्याने खिडकीतून खाली पडून जखमी झाली. या कानाची त्या कानाला खबर होणार नाही याची दक्षणा संपूर्ण यंञणेने घेतली. मुलगी खाली पडल्याचे पाहुन चालकाला चक्कर आली होती. कोपरगाव आगाराच्या खिळखिळ्या झालेल्या गाड्यामुळे प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे.


