मोफत आधार कार्ड उपक्रमाला प्रभाग १२ मध्ये प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरबाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रभाग क्रमांक १२ मधील मिल्लतनगर फातेमा मस्जिद परिसरातील पार पडलेल्या मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचा ० ते ५ वयोगटातील बालकासह सर्व वयोगटातील सुमारे २०० नागरिकांनी लाभ घेतला.

        मौलाना आबेद हाफिज साहब यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी मौलाना म्हणाले, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या काळात शासनाच्या विविध सोयीसवलतीच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असून आधार कार्ड ही मनुष्याची खरी ओळख आहे. त्यामुळे  आधार कार्ड संबंधिताच्या  बँक खाते, पॅन कार्ड, मतदान कार्ड आदींसह विविध ठिकाणी प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

       बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, राष्ट्रवादी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, युवा नेते अजिंक्य लांडे, फिरोज पठाण, हाजी शफिक भाई, आयुब पठाण, रिजवान शेख, जमीर पठाण, इरफान पठाण, आदींसह परिसरातील  रत्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      आधार कार्ड नोंदण्यासाठी पहिल्या दिवशी मोठी गर्दी उसळल्याने हा उपक्रम दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवण्यात आला. आरबाज शेख यांच्य्यासह जमीर शेख, ख्वाजा शेख, जहाजी शेख, एजाज शेख, संकेत फडके, अनिस शेख, अकिब मुजावर आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.