शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर २ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत भारतीय जनता पार्टी आयोजित ‘सेवापंधरवाडा’ निमित्ताने आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव भाजपा मंडलात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मौजे वडुले बुद्रुक येथे भाजपा शेवगाव मंडळाचे संघटन सरचिटणीस भीमराज सागडे यांचे नेतृत्वाखाली
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी ७५ नागरिकांची रक्तदाब तसेच साखरेची ३५ महिलांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली, तर अकरा कुष्ठरोग रुग्णांना तपासणीसाठी तालुका स्तरावर पाठवण्यात आले. तसेच लंम्पी स्किन आजाराच्या संदर्भात जनावरांची तपासणी करुन शंभरावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्रा. नितीन मालानी, सुरज लांडे, मच्छिंद्र बर्वे, किरण काथवटे, अमोल माने यांनी तळणी येथील गोशाळेत गो ग्रास पेंड, हिरवा चारा व रोख स्वरूपात देणगी दिली. तसेच श्री संत धुंडा महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप केले.
त्याचप्रमाणे बोधेगाव परिसर आज एकनाथ उर्फ बाबा सावळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतआबा गरड, अनिल परदेशी, विक्रम बारवकर, मिठूबप्पा काजळे, आधोडीचे सरपंच सुगंध खंडागळे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ घोरतळे, गणपत खेडकर, जमील मनेर, अशोक बाणाइत, विठ्ठल भोंगळे आदींच्या उपस्थितीत दराडे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करुन येथेही जनावरांची तपासणी व लसीकरण करण्यात आले.
महिला आघाडी तालुका अध्यक्षा आशाताई गरड यांनी अमरापुर येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले, यावेळी हेल्थ फिटनेस सल्लागार वैशाली दराडे यांनी महिलांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच डॉ. अनंत सातपुते, डॉ. श्रीमती सातपुते यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. गणेश गरड, संदीप बोरुडे, संगीता बोरुडे व महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.