विद्यार्थिनींनी खेळाबरोबरच स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवून शाळेसह गावाचे नाव लौकिक करावे – माजी मंत्री घोलप                                           

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २३ : कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयास माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी भेट देऊन शाळेच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या समवेत शाळेचे उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे महासंघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप कानडे, सिद्धेश्वर सुरवसे, गोरख टेके, तालुका अध्यक्ष अशोक कानडे,संजय पोटे, नंदकुमार गोसावी, आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी समृद्धी बोधे,शर्वरी कहार, रिया गायकवाड, शेजल बोरसे,श्रुती मुरडनर, समृद्धी रौंदाळे यांनी जिल्हा व राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून पारितोषिक मिळवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शैक्षणिक साहित्य, पदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्नेहा दिलीप कानडे यांचा महालक्ष्मी सजावट परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल व माजी मंत्री बबनराव घोलप यांचे स्वीय सहाय्यक व अंगरक्षक नंदकुमार गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.       

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त करताने म्हणाले की विध्यार्थिनींनी शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धाबरोबर स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवून शाळेसा गावाचे नाव लौकिक करावे अशी अपेक्षा श्री. घोलप यांनी व्यक्त केली.तसेच सत्काराला उत्तर देताना प्राचार्या मंजुषा सुरवसे म्हणाल्या की मागील चार वर्षापासून शाळेतील विद्यार्थिनींची गुणवत्ता वाढीसाठी  विद्यार्थिनींना विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यास प्रयत्न केले व विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी रुंद यांच्या सहकार्यातून सहभाग नोंदविला.

तसेच अनेक विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षीसे मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे तसेच शाळेला रयत शिक्षण संस्थेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त केला.या कार्याची पावती म्हणून मला आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिळाला.या पुरस्काराचे सर्व श्रेय हे शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थिनींना यांना जाते व यापुढे असेच कार्य सतत पुढे ठेवत राहील अशी ग्वाही सौ. सुरवसे यांनी  दिली. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरुण बोरनारे, मनोहर म्हैसमाळे, प्रवीण निळकंठ,किरण चांदगुडे, नितीन निकम, दीपक भोये उमेश पवार, वेणूगोपाल अकलोड,सतीश मेंढे, संजय गावित्री,माधुरी हरदास,नंदा बढे,सविता चंद्रे,सविता गावित,सविता साबळे, भारती गागरे,गीतांजली गायकवाड, ज्योती गायकवाड आदिसह शिक्षक शिक्षिकांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन किरण चांदगुडे तर आभार प्रवीण निळकंठ यांनी मानले.