प्रियदर्शनी महिला मंडळाचेवातीने दि. ४ ओक्टोबर २२ रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नवरात्र उत्सव निमित्त  ‘जागर स्त्री शक्तीचा’कार्यक्रम  साजरा होत असून या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांच्या मागणीवरून मंगळवार (दि.०४) रोजी होम मिनिस्टर चा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

Mypage

मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वच सण-उस्तव अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. त्यामूळे मागील दोन वर्ष दरवर्षी उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने (डिजिटल नवरात्र उत्सव) साजरा करण्यात आला होता.

Mypage

मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारी बऱ्याच अंशी आटोक्यात आलेली असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. त्यामुळे या वर्षी हा नवरात्र उत्सव देखील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळा अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून या उत्सवास महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

Mypage

या नवरात्रोत्सवा मध्ये महिला भगिनींसाठी योग स्वास्थ्य शिबीर तसेच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, केक सजावट स्पर्धा, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या देवीच्या विविध दागिन्यांची स्पर्धा त्याचप्रमाणे महिलांचा आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Mypage

या सर्वच स्पर्धामध्ये कोपरगाव शहरासह तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी उपस्थित राहून स्पर्धक महिलांचा उत्साह वाढविला.

Mypage

 उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला “होम मिनिस्टर” खेळ तर महिलांना अतिशय भावला असून मागील दोन वर्ष ज्या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही त्या कार्यक्रमाला महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा कार्यक्रम पुन्हा घेण्याची मागणी सौ. पुष्पाताई काळे यांच्याकडे केली होती. त्यामुळे महिला भगिनींच्या आग्रहास्तव हा कार्यक्रम पुन्हा घेण्यात येणार आहे.

Mypage

या उत्सवात सहभागी होवून विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना मंगळवार (दि.४/१०/२०२२) रोजी मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याच्या “होम मिनिस्टर” खेळात अजून कोण मानाच्या पैठणीची मानकरी होणार याबाबत महिला भगिनींमध्ये उत्सुकता पसरली आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *