शेवगाव बसस्थानकात मरणयातना भोगणाऱ्या वृद्धाची सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली दाखल

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगांव बसस्थानकात पायाला गंभीर जखम असल्याने एक वृद्ध बेवारस व्यक्ती गेल्या तीन दिवसापासून विव्हळत पडली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, पत्रकार रवींद्र  उगलमुगले, एसटी युनियनचे सचिव दिलीप लबडे यांनी आज 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालयात पोहोच करुन वैद्यकीय मदत मिळवून दिली.

Mypage

       शेवगाव बस स्थानकात निवृत्ती आव्हाड हा बेवारस वृध्द गेल्या तीन दिवसापासून पायाच्या गंभीर जखमेमुळे मरणयातना भोगत होता .पायाच्या जखमेवर डास माशा बसून त्या घेत असलेला चावा सहन होत नसल्याने त्याने त्या जखमेवर दगड ठेवले होते. एका बाजूला पडून त्याचे विव्हळणे चालू होते. जखमेची दूर्गंधी परिसरात सुटली होती. मात्र आपल्या बसस्थानकात अशा अवस्थेत पडलेल्या या बेवारस वृद्धाकडे आगार व्यवस्थापक वा कोणा जबाबदार अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही.

Mypage

   मात्र बसस्थानक परिसरातील हातावर पोट असलेली फळविक्रेती महिला  भोरी खोडदे या गरीब महिलेने या काळात त्याला दोन वेळेस  जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. तिनेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  राज्य कौंसिल सदस्य काॅ.संजय नांगरे यांना त्याची कल्पना दिली. तेव्हा नांगरे, पत्रकार रवींद्र उगलमुगले, एसटी युनियनचे दिलीप लबडे यांनी त्याची लगेच दखल घेतली. शेवगावची 108 ऍम्ब्युलन्स उपलब्ध नाही हे समजल्यावर  नेवासेला संपर्क साधून तेथून ती बोलावून त्याला शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पोहच करुन  वैद्यकीय मदत मिळवून दिली.

Mypage

       डाॅ.प्रतिभा बनकर, १०८ चा चालक  नवाज बाबुलाल शेख, पत्रकार प्रवीण खोमणे, तसेच स्वतः नांगरे व उगलमुगले  यांनी वृध्द गंभीर अवस्थेत आणि दुर्गंधी सुटलेली असतांना देखील मास्क लावून त्याला रुग्णवाहिकेत टाकून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. परिसरातील  नागरिकांनी मदतीला धाऊन येणाऱ्या या तरुणांना धन्यवाद दिले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *