कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील सुरेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसयटीची वार्षीक सर्वसाधारण सभा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलासराव वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणांत नुकतीच संपन्न झाली.
प्रारंभी सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत प्रतापराव वाबळे व उपाध्यक्ष शंकरराव कचरू कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, देशाचे सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्यासह अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवरांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यांत आली.
जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांचे सुरेगांव सोसायटी सभासद शेतक-यांच्या उत्कर्षात योगदान असुन त्यांनी संस्थेच्या प्रत्येक अडचणीत मोलाची साथ दिली आहे.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व संस्थेचे आधारस्तंभ मोहनतात्या वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद शेतक-यांच्या उन्नतीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू असे विलासराव वाबळे म्हणाले, सुरक्षा कम्पाउंड व थकबाकीबाबत गोरख कदम व गणेश वाबळे यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला. सचिव शांताराम कदम यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले सभासदांनी ते कायम करत सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले.
याप्रसंगी संचालक गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर, शेतकरी संघाचे संचालक छबुराव माळी, पांडुरंग वाबळे, दिपक हुडे, शांताराम मेहेरखांब, चंद्रभान मेहेरखांब, नेमीचंद शेटटी, सुकदेव भंडारी, उत्तमराव निकम, यशवंत निकम, सोपान सोनवणे, सर्जेराव वाबळे, भरत वाबळे, रामभाउ वाबळे आदि यावेळी उपस्थित होते. शेवटी संचालक गोरख कदम यांनी आभार मानले.