शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : येथील पत्रकार रामनाथ रुईकर यांच्या मातोश्री, वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्या गयाबाई विष्णू रुईकर ( वय ६५ ) यांचे काल गुरुवारी (दि.०६ ) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
कै गयाबाई अत्यंत धार्मिक होत्या. काल गुरुवारी सकाळी तालुक्यातील बोडखे येथे त्या प्रवचन ऐकण्यासाठी गेल्या असता कार्यक्रमातच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शेवगावला आणण्यात आले होते . मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.