अल्पवयीन मुलीशी  गैरवर्तन करणारा शिक्षक गजाआड

कोपरगाव प्रतिनिधी दि.१० : कोपरगाव तालुक्यातील एका शाळकरी मुलीशी गैरवर्तन करुन शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील एका शाळेत घडला आहे. गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलीसांनी गजाआड केले आहे. 

 कोपरगाव तालुका पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की,तालुक्यातील एका गावातील १३ वर्षाच्या शाळकरी मुलीशी नराधम शिक्षक नितीन रघुनाथ आमकर वय ४७ वर्षे याने पिडीत मुलीशी अश्लील संभाषण करून गैरवर्तन  करण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीने झालेल्या घटनेची माहीती दिल्यानंतर संबध त धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

त्यावरुन  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये नराधम शिक्षका विरोधात शनिवारी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ घटनेचे गांभिर्य ओळखून नराधम शिक्षकाला ताब्यात घेवून कोपरगाव न्यायाधिशासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याल तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  दरम्यान संबधीत शिक्षकाचे वर्तन शिक्षकीपेशाला काळीमा फासणारे असल्याने त्याच्या या कृत्याबद्दल सर्व स्थरातुन निषेध व्यक्त होत आहे.