खंदकनाल्याचे रूंदीकरण करताना सापडला जूना पूल, पालीकेच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : मुसळधार पावसाच्या पाण्याने कोपरगावच्या खंदक नाल्याची खरी अवस्था उघड केली. आणि शुक्रवारी तर चमत्कार घडला. शहराच्या मुख्य रस्त्याजवळील अर्थात समता पतसंस्थेच्या समोर एका जून्या पूलाचा पुन्हा उदय झाला. खंदकनाल्याचे साचणारे पाणी सुसाट वेगाने गोदावरी नदीकडे झेपावू लागले.  खुप वर्षापुर्वी नाल्याचे पाणी नदीकडे जाण्यासाठी दगडी पुल बांधण्यात आला होता माञ काही अति तज्ञ अभियंत्यांनी किंवा तत्कालीन अधिकाऱ्यांनी कोपरगावच्या या महत्वाच्या पुलाला बुजवून नाल्याची खोली कमी करण्यासाठी व इतरांना त्यावर अतिक्रमण करण्यासाठी सोपे व्हावे या उदात्त हेतुने हा महत्वाचा पूल व त्याच्या नळ्या बंद करुन त्याच्या वरती तीन नळ्या टाकुन नवा पुल बांधण्यात आला.

Mypage

कालांतराने दरवेळी नदीला पाणी आले की कोपरगाव शहरात याच खंदक नाल्यातुन  नागरी वस्तीत व मुख्य रस्त्यावर पाणी येत असल्याने कोपरगाव शहराची पूररेषा केवळ या खंदक नाल्यामुळे वाढवण्यात आली. या पूररूषे संदर्भात लोकसंवादने आवाज उठवल्या नंतर कदाचीत वरूणराजालाही वाटले असावे कि पूररेषा चुकीची आहे आणि गुरुवारी राञी मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा खंदक नाल्याला पूर आला. अनेकांच्या घरात पाणी गेले. गोदावरी नदीला पूर नसताना पूर आला.

tml> Mypage

अनपेक्षित आलेल्या पूरामुळे नागरीकांमध्ये रोष वाढू नये म्हणून पालीका प्रशासनाने तातडीने खंदक नाल्यावरील झालेले अतिक्रम काढण्यास सुरुवात केले. गोकुळनगरी जवळील एका खाजगी जागेच्या मालकाने नाल्यावर चुकीच्या पध्दतीने पूल बांधला होता तो पूल पालीकेने  जेसीबीच्या सहाय्याने उखडून काढण्यात आला. समता पतसंस्थे समोरील बाजुला रस्त्याला खेटुन खंदक नाला लुप्त झाला होता त्या ठिकाणी काही नागरीकांनी नाला बुजवून अनाधिकृत बांधकाम केले होते ते बांधकाम काढून नाल्याची खोली व रूंदी वाढवण्यात आली. 

Mypage

त्याच्या एका जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना सिमेंटच्या तीन मोठ्या नळ्या दिसल्या त्या नळ्यांची स्वच्छता करताना अचानक खाली एक दगडी पूल दिसला त्याच्यात आडकलेली घाण साफ केली असता नाल्याच्या  वरून वाहणारे पाणी चक्क खालून अलगत गतीने गोदावरीच्या दिशेने जावू लागले आणि पालीकेच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक दिवसांपासून तुंबणाऱ्या पाण्याचे कोडे काही प्रमाणात आज उलगडले. 

Mypage

  नाल्याची रुंदी व खोली वाढवून नाल्याच्या पाण्याची वाट मोकळी करण्याचा प्रयत्न पालीका प्रशासनाने सुरु केल्याने आगामी पूरस्थितीजन्य परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.  २० ऑक्टोबरच्या पावसाने पालीका प्रशासनासह पाटबंधारे विभागाला जाग आणली आहे. केवळ नदीच्या पाण्यामुळे  महापूर कोपरगाव शहरात येतो. त्या पाण्यावरून कोपरगाव शहराची पूररेषा निश्चित केली होती. त्याला १४ वर्षे झाले तरी आजूनही जूनी पूररेषेत काहीच बदल झाला नाही. भविषातील २० वर्षाच्या विकास आर खड्यात सध्याची पूररेषा पुसणे गरचे आहे. 

Mypage

लोकसंवादच्या वृत्तमालिकेने स्पष्ट झाले की, पुराचे पाणी फक्त नदीच्या पाण्यामुळे नाही तर खंदक नाल्यामुळे  येते. पालीकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य विभागाचे अधिकारी सुनिल आरण यांनी एका दिवसात तातडीने खंदक नाल्याच्या कामाला गती दिली आहे. या संदर्भात अधिक माहीती देताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, खंदकनाल्याची खोली व रूंदी वाढवणार असुन भविष्यात खंदक नाल्याच्या पाण्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेतली जाईल. मुख्य रस्त्यालगतचा हा  नाला यापुढे खुला ठेवून एका विशिष्ट पध्दतीने त्याचे नव्याने बांधकाम करण्याचे नियोजन आहे. या नाल्याच्या कामासाठी विशेष निधीची मागणी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे करणार आहे. असेही गोसावी यांनी सांगितले.

Mypage