काकडी येथे ‘ धन्यवाद मोदीजी ‘ पत्र लेखन उपक्रम संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर-गरीबांचे कल्याणासाठी केंद्र शासन अंतर्गत विविध योजनांची आखणी करून त्या तळागाळातील प्रत्यक्ष लाभधारकापर्यंत पोहोचविल्या हीच त्यांच्या सुशासनाची पावती असल्याचे प्रतिपादन भाजपा युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर नगर जिल्ह्याचे प्रभारी विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी केले.     कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काकडी येथील विविध लाभर्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विवेध योजनांचा लाभ मिळाला त्याबद्दल ‘धन्यवाद मोदीजी ‘ पत्र लेखन उपक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. 

           प्रारंभी उत्तर नगर जिल्हयाचे भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम डेरे यांनी प्रास्तविकात या योजनांचा जिल्हा आढावा घेऊन त्यात राबविल्यi जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता  कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक  कोल्हे यांनी कोपरगांव मतदार संघातील सर्व योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यरत असल्याचे भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी याप्रसंगी सांगितले.

         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पी एम किसान योजना, सुकन्या योजना, गरीब कल्याण योजना, मोफत लसीकरण, आयुष्यमान भारत, उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत बेटी बचाव बेटी पढाओ या सारख्या अनेक लोक कल्याणकारी योजना देशातील सर्व सामान्य नागरिकांना लाभ देण्याचे काम कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. अंतोदय ते उदय भारत या विशिष्ट उंचीवर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी केले आहे.

श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, सरपंच पूर्वा गुंजाळ, साखरबाई सोनवणे , उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, सोशल मीडिया अध्यक्ष कानिफनाथ गुंजाळ, बाबासाहेब सोनवणे, चंद्रभान गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, विलास डांगे, वाल्मीक कांडेकर, भीमराज गुंजाळ, विजयराव डांगे, अनिल शिंदे, बाळासाहेब मोरे, इंद्रभान गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ, सुनील खांडेकर, दिगंबर कांडेकर, बाळासाहेब गांगवे, सुमित कोल्हे, नवनाथ आरणे, मयूर सोनवणे, सतीश डांगे, अभिषेक डांगे, कुमार सोनवणे, अभिजीत सोनवणे, अभिजीत गुंजाळ, ज्ञानेश्वर सोनवणे, दशरथ सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.