दिव्यांग महामंडळ घोषणेचे शेवगावात स्वागत

फटाके उडवून, मिष्टान्नाचे वाटप करत आनंद साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : राज्य शासनाने  दिव्यांगासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे नुकतेच जाहीर केले. या निर्णयाचे तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. या निमित्ताने  संघटनेच्या कार्यालयात आज शनिवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात फटाके वाजवून व मिष्टान्नाचे  वाटप करून कार्यकर्त्यांनी आपला आनंद द्विगुणित केला.

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आवाहनानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगासाठी स्वतंत्र महामंडळ कार्यान्वित झाल्यावर दिव्यांगांच्या विविध  अडचणींना निश्चित न्याय मिळेल अशा भावनां संघटनेचे तालुका संघटक गणेश हनवते यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी निळकंठ कराड, किशोर गरंडवाल, संदीप चेडे, विठ्ठल घवले, संजय पल्लोड, प्रभाकर आव्हाड, लक्ष्मण शिंदे, सोहेल पठाण, रिजवान शेख, अण्णासाहेब मोहिते, सुरेश मोहिते, राजेंद्र खेडकर, सौरभ शिंदे, बाळू जायभाय आदी दिव्यांगांची उपस्थिती होती.