राहूल गांधीच्या वक्तव्या बाबत शेवगावात निषेध

शेवगाव प्रतिनीधी, दि. १९ : भारत जोडो यात्रे दरम्यान काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबत अपमान जनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज येथील क्रांती चौकात राहुल गांधी यांच्या निषेधात घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

      यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे म्हणाले, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत समस्त हिंदू समाज व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अशा प्रकारची अतिशय चुकीची अशोभनीय टीका  केली आहे.  त्यांनी असे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे,अन्यथा  अधिक उग्र स्वरूपाची आंदोलने होतील. 

 सुनिल रासने, रविन्द्र सुरवसे, डॉ. निरज लांडे पाटील, महेश फलके, जगदीश धूत,देविदास हुशार,दिलीप सुपारे, गणेश डोमकावळे,केशव भुजबळ, अण्णासाहेब ढोबळे, ज्ञानेश्वर देहाडराय, बाप्पू धनवडे, मछींद्र भडके, किरण काथवटे, अमोल माने, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी सहा. पोलिस निरिक्षक विश्वास पावरा, गुप्त वार्ताचे बप्पासाहेब धाकतोडे, पो. काॅ. अशोक लिपने पो.कॉ. प्रविण बागुल यांनी याठिकाणी धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्या कलम ३७(१) चे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपाचे सुनिल रासने, भाजपाचे शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, डॉ. नीरज लांडे पाटील, केशव भूजबळ, मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष रांधवणे, उपाध्यक्ष देविदास हुशार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अमोल पालवे  यांच्यावर गुन्हा दाखल करुन नंतर त्यांना सोडण्यात आले.