शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : वीज बील वसुलीसाठी राज्य सरकारने शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा अन्यथा माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांचे नेतृत्वाखाली तालुक्यात मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज तहसिलदार छगनराव वाघ व वीज केंद्राचे उपअभियंता एस.एम. लोहारे यांना देण्यात आला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना करीत आहे. महावितरण कंपनीने २२ नोव्हेबंर रोजी एक पत्रक काढून शेतक-यांचे वीज कनेक्शन वीज बिल वसुलीसाठी कट करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यत दुर्देवी आहे.
शेतकरी अतीवृष्टीचा सामना करीत असातंना अशा प्रकारचे धोरण घेणे निश्चितपणे चुकीचे आहे. आतापर्यंत शेतक-यांना अतीवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. तसेच खरीप कपाशी, बाजरी, तुर व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शेतीसाठी केलेला खर्च ही निघलेला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहे. त्यामुळे शेतकरी वीज बिल भरु शत नाही. त्यामुळे शासनाने सक्तीची वीज बिल वसुली त्वरीत थांबवावी. तसेच थंडीमध्ये रात्री वीज न देता दिवसा वीज देवून शेतक-यांना दिलासा दयावा. हा निर्णय तातडीने रद्द न केल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
यावेळी कार्यकत्यांनी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली. ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे संचालक संजय फडके, युवकचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, कमलेश लांडगे, वडुले सरपंच प्रदिप काळे, विष्णूपंत बोडखे, बप्पासाहेब लांडे, विजय पोटफोडे, दिपक चोपडे, समीर शेख, सोमनाथ महिते, शहनवाज कुरेशी, कुंडलीक चव्हाण, चाँद पठाण, रोहन साबळे, पांडुरंग झिरपे, गंगा नरवडे, इम्रान मनियार, रिजवान पठाण, आप्पा मगर, अश्पाक पठाण आदी उपस्थित होते.