कोपरगांवच्या ४ हजार विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग – स्नेहलता कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : परिक्षेवर चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

      कोल्हे पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या मनावरील परिक्षेचा ताण हलका व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१८ सालापासुन परिक्षेवर चर्चा उपक्रम राबवित आहे. त्यांची संकल्पना संपुर्ण राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावीपणे राबविली आहे. 

         शहरासह संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात बुधवारी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जी २० जागतिक विश्वगुरू बनण्याच्यादृष्टीने भारताची वाटचाल, आझादीचा अमृत महोत्सव, सर्जीकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणांत भारत पहिल्या कमांकावर, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदान, बेटी बचाव बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला हे दहा विषय चित्रकला स्पर्धेसाठी निवडण्यांत आले होते. त्यात चार हजार विद्यार्थी -विद्यार्थीनी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, के. बी.पी. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कातकडे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरवसे ताई, कला शिक्षक अमोल निर्मळ, जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, शहराध्यक्ष रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, राजेंद्र औताडे, खालिकभाई कुरेशी, स्वप्नील निखाडे, दिनेश कांबळे, रविंद्र रोहमारे, जगदिश मोरे, गोपिनाथ गायकवाड, विवेक सोनवणे, सागर जाधव, मुख्तार पठाण, फकिर महंमद पहिलवान, विकांत सोनवणे, सलिम पठाण यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.