श्रीमान गोकुळचंद विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागरूक पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली.

या अभियाना अंतर्गत सर्व शासकीय शासकीय शाळा, खाजगी शाळा येथिल शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींची तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भसेवा पुरवण्यात येणार आहेत अशी माहीती सचिन यादव वैदयकीय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय यांनी दिली.

या आरोग्य तपासणी करता कोपरगांव ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय पथक विद्यालयामध्ये हजर होते. या पथकांमध्ये डॉ. जितेंद्र रणदिवे, डॉ. काजल गलांडे, डॉ. दीपाली आचार्य, डॉ. मनिषा बेंद्रेस व डॉ. सपना भंडारी यांचा समावेश होता.  या आरोग्य पथकामार्फत सलग दोन दिवस विदयार्थीची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या तपासणीतून आवश्यकतेनुसार बालकांना नागरी आरोग्य केंद्रात मंगळवार आणि शुक्रवारी तसेच ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी शनिवारी तपासणी शिबिरात पाठवण्यात येणार आहे. या सर्व तपासणीत पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास बालकांना जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाठविण्यात येणार आहे.

हया अभियानत  पुढील दोन महिन्यांमध्ये आरोग्य  तपासणीचे नियोजन आहे. अशी माहीती वैदयकीय अधिकारी डॉ. जितेंद्र रणदीवे यांनी दिली. या वेळी सर्व वैदयकीय पथकांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले.