कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील १७ शेतकऱ्यांना अखेर १८ वर्षांनंतर जमिनीचा मोबदला मिळाला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदर शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे १ कोटी १२ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. कोल्हे यांच्यामुळे मागील १८ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील सुरेश जाधव, दत्तात्रय जाधव, नानासाहेब भवर, संजय जाधव, मोहन जाधव, संजय भवर, विनोद नाईकवाडे, ज्ञानेश्वर पवार, दगू वारकर, किसन वारकर, किसन जाधव, धनंजय जाधव, गोरख पवार, गोरख भवर, गौरव खैरनार, अनिताबाई भवर, मंदाबाई पवार, मंदाबाई वारकर आदी शेतकऱ्यांची जमीन नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. २ वरील उपवितरिका क्र. ४ व ५ (डावी बाजू) साठी संपादित करण्यात आली होती. या भूसंपादन प्रकरणी अंतिम निवाडा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.
काही शेतकऱ्यांची नावे ही भूसंपादन झालेले नसताना अंतिम निवाड्यात समाविष्ट करण्यात आल्यामुळे सरळ खरेदी प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी जलसंपदा विभाग, भूमी अभिलेख, उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, शिर्डी, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग, वैजापूर व कोपरगाव येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणात तात्काळ कार्यवाही होत नसल्याने या शेतकऱ्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे हा प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खोपडी येथील या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य केले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करून सदरील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला तातडीने देण्याची सूचना केली. अखेर १८ वर्षांनंतर नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे.
खोपडी येथील सुरेश जाधव, दत्तात्रय जाधव, नानासाहेब भवर, संजय जाधव, मोहन जाधव, संजय भवर, विनोद नाईकवाडे, ज्ञानेश्वर पवार, दगू वारकर, किसन वारकर, किसन जाधव, धनंजय जाधव, गोरख पवार, गोरख भवर, गौरव खैरनार, अनिताबाई भवर, मंदाबाई पवार, मंदाबाई वारकर आदी शेतकऱ्यांना शासनाने संपादित केलेल्या त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे १ कोटी १२ लाख रुपये एवढी रक्कम मिळाली आहे
नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. २ वरील उपवितरिका क्र. ४ व ५ साठी आमची खोपडी शिवारातील जमीन शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा योग्य तो मोबदला त्वरित मिळावा, यासाठी आम्ही सर्व शेतकरी गेल्या १८ वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. मात्र, आम्हाला जमिनीचा मोबदला दिला जात नव्हता. आम्हाला जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा म्हणून बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला. कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांचे आम्ही सर्व शेतकरी ऋणी आहोत, अशी प्रतिक्रिया लाभार्थी शेतकरी संजय जाधव, सुरेश जाधव, दत्तात्रय जाधव, नानासाहेब भवर, मोहन जाधव, संजय भवर, विनोद नाईकवाडे, ज्ञानेश्वर पवार, दगू वारकर, किसन वारकर, किसन जाधव आदींनी व्यक्त केली. यावेळी अमोल नवले, काशीराम नवले यांच्यासह खोपडी येथील सर्व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील जवळपास १७ शेतकऱ्यांची जमीन नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. २ वरील उपवितरिका क्र. ४ व ५ (डावी बाजू) साठी संपादित करण्यात आली होती. संबंधित शेतकरी गेल्या १८ वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करून या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम त्वरित द्यावी, अशी सूचना केली व यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या. गेल्या १८ वर्षांपासून जमिनीच्या मोबदल्यासाठी लढा देणाऱ्या या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. याबद्दल संबंधित सर्व शेतकऱ्यांचे बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.