शिवसेनेचे जिल्ह्याप्रमुख प्रमोद लबडे यांचा वारीत सर्वपक्षीय नागरी सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : तालुक्यातील वारी येथील रहिवाशी असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांचा रामनवमीच्या पावन पर्वावर एका दिमाखदार कार्यक्रमात वारीचे जेष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके पाटील व प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे यांचे शुभहस्ते वारीचा मानाचा फेटा बांधुन हार शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.  

    वारी ग्रामपंचायत समोर रामनवमीचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात प्रभु श्रीराम प्रतिमेचे लबडे यांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पुजेचे पौरोहित्य अँड शरद जोशी यांनी केले.

        यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारीचे जेष्ठनेते पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी प्रास्तविक केले. तर अँड शरद जोशी, अशोकराव टेके, पोपराव गोर्डे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, एम के टेके, प्रकाशराव गोर्डे आदी सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगत व्यक्त करून लबडे व ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. 

        अध्यक्ष पदावरुन बोलतांना शिवसेना पदाधिकारी यांचे कौतुक करतांना आनंद होत असल्याचे सांगत चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीवर शाबासकी देण्याची वारीगावची परंपरा असल्याचे सांगत भाजपा नेते कै सूर्यभान वाहडणे पाटील यांच्या नागरी सत्काराची आठवण त्यांनी करून दिली अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही जबाबदारी तुमच्याकडे  आली तुम्ही ती पार कराल असा विश्वास व्यक्त करुन प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे अशोकराव कानडे यांच्या सारखे लढणारे निष्ठावंत शिवसैनिक असल्याने शिवसेनेची नौका या राजकीय वादळातही तरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

        सत्काराला उत्तर देतांना प्रमोद लबडे यांनी बाल शिवसैनिक म्हणुन सुरुवात केली होती. त्यावेळच्या आठवणी सांगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या विचारांचा प्रभाव उध्दव साहेब घोलप साहेब यांचा विश्वास सार्थ ठरवत जिल्हाप्रमुख कसा असावा हे कामातून दाखवून देणार असल्याचे सांगुन गावासाठी रात्रंदिवस काम करण्याची ऊर्जा या सत्काराने दिल्याचे सांगुन सर्वांचे आभार मानले

         तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी बोलतांना कान्हेगावत जन्म व वारीत सोमय्या शाळेत शिक्षण व भोजडे येथे  कर्मभूमी असल्याने आजवर खूप शिकायला मिळाले गावच्या सत्कारामुळे जबाबदारी वाढली असून पदाचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करणार असल्याचे सांगत सर्वपक्षीयांचे आभार मानले

       यावेळी माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, ग्रा.प. सदस्य दिलीप देशमुख, प्रकाशराव गोर्डे, सचिन टेके, नारायण वाळुंज, वाहेद पठाण, अनिल सिंग, राजपाल सिंग, आसाराम डहारे, भाऊसाहेब टेके, ह. भ. प. शंकर गोंडे, संतोष गायकवाड उपसरपंच विशाल गोर्डे, सोमनात थोरात, रावसाहेब कर्डे, अशोक जाधव, निवृत्ती बागुल, गणेश भाटी, पत्रकार बापुराव घुमरे, मनोज वाघमारे, माजी उपसरपंच बाबासाहेब निकम, गोरख टेके, संदीप जाधव, जय नवले, रामेश्वर कानडे, प्रफुल्ल गायकवाड रावसाहेब वाघ,

यांचेसह कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष, शिवसेना,युवासेना, वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसपार्टी, राजे प्रतिष्ठान, भगवे वादळ, दि गोदावरी बायो रिफायणारीज कर्मचारी कामगार संघटना श्री साईसेवा पदयात्री मंडळ, जयबाबाजी भक्तपरिवार, अंबिका उद्योग समुह, आदी धार्मिक मंडळाचे व विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी लबडे व ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी  कान्हेगाव वारी साकरवाडीचे ग्रामस्त युवक व शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन अशोकराव कानडे यांनी तर आभार गोरख टेके यांनी मानले.