कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : माजी आमदार तथा भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यात नवीन प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, या कामाला प्रशासकीय मान्यतादेखील मिळाली आहे.
कोपरगाव शहरातील नवीन प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. हा प्रमुख व वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती; परंतु विद्यमान आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नवीन प्रभाग क्र.४ मधील या प्रमुख रस्त्याबरोबरच शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या व इतर कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी सातत्त्याने पाठपुरावा केला होता.
अखेर कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, कोपरगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये नवीन प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा निधी मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, कैलास जाधव, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुलशेठ काले आदींनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीतील शहरातील विविध भागातील मुख्य डांबरी रस्ते, अतिमहत्त्वाचे तीन पूल, अंतर्गत रस्ते, गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी विविध कामांसाठी निधी द्यावा, यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता.
कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा विविध योजनांमधून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून विविध भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पुलांचे व गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक अशी विविध कामे करण्यात येणार असून, या कामांना प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळाली आहे. जनसेवेसाठी नेहमीच तत्पर असलेल्या स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहरातील रस्ते, पूल, गटारी व अन्य विकासकामांना प्रचंड निधी मिळाला असून, याबद्दल शहरवासियांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत.