श्रमिक मजदूर संघाच्या शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांचा सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : भारत देशामध्ये सर्वात कमी मानधनावर काम करणारे शालेय स्वयंपाकी व मदतनीस हे कर्मचारी आहे.यांचा सोमवारी दुपारी एक वाजता पंचायत समिती कार्यालय कोपरगाव येथे आपल्या विविध मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने मध्यान्ह भोजन आहार योजना राबविण्यात येते.

या योजनेत विद्यार्थ्यांना भात, वरण, खिचडी शिजवून दिली जाते. यासाठी काम करणारे जे कर्मचारी आहेत स्वयंपाक मदतनीस हे स्थानिक भागातीलच आहेत. परंतु हे कर्मचारी आजपर्यंत 53 रुपये रोजाने म्हणजेच दीड हजार रुपये महिन्याने काम करत आहे. त्यांना फक्त दहा महिन्याचे मानधन दिले जाते. दहा महिन्याचे मानधन हे पंधरा हजार रुपये इतके आहे. म्हणजे दारिद्र रेषेखालील असणारे उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आहे.

मानधन वाढीसाठी व इतर मागण्यांसाठी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सविता विधाते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सर्व  शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी यात सामील होण्याचे आवाहन आहे त्यांनी केले आहे.