शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : तालुक्यातील २०२२ मधे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप ही अनुदान मिळाले नाही त्यातच अवकाळी पावसामुळे व वादळामुळे ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांचे ही पंचनामे झाले नाहीत, पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांचे अनुदान अचानक बंद झाले आहे.
याबाबद शासकीय पातळीवर ताबडतोब दखल घेऊन २०२२ च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान ताबडतोब त्यांच्या खात्यावर जमा करावे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी या मागणी साठी भा .क.प . व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करून नायब तहसीलदार राजेंद्र दिवान यांचेकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे पाटील, जेष्ठ नेते कॉ. शशीकांत कुलकर्णी, संजय नांगरे, भगवानराव गायकवाड, बापूराव राशिनकर, बबनराव पवार, बबनराव लबडे, दत्तात्रय आरे, अशोक नजन, ॲड. भागचंद उकिर्डे, गोरक्षनाथ काकडे, राम लांडे, रामनाथ डाके, ज्ञानेश्वर बोडखे, सतीश चित्ते, आण्णासाहेब मोरे, व शेतकरी उपस्थित होते.

