रेरा कायद्यानुसारच बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना सुविधा देणे गरजेचे – ॲड. मयुरा वाळींबे 

कोपरगाव प्रतिनिधी दि.२ : नवीन घर, फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांकडून कोणतीही फसवणु होणार नाही किंवा  बांधकाम व्यावसायिकांनी रेरा व महारेरा कायद्याच्या नियमावलीत राहुन ग्राहकांना सुविधा पुरविणे अपेक्षीत आहे अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल होवुन शकतो अशी माहिती ॲड. मयुरा वाळींबे यांनी दिली. 

कोपरगाव येथील हाॅटेल स्वस्तिकच्या सभागृहात कोपरगाव- शिर्डी परिसरातील बांधकाम व्यवसायीकांच्या  क्रेडाई संघटनेच्या वतीने बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांच्या कायदेशीर समस्या या विषयावर कायदेतज्ञ ॲड. मयुरा वाळींबे यांच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक, उपाध्यक्ष  विलास खोंड,सचिव चंद्रकांत कौले, मनोज अग्रवाल, राजेश ठोळे, मनिष फुलफगर, दिनार कुदळे, सचिन बोरावके,हिरेन पापडेजा, सिध्देश कपिले, किसन आसणे, किरण आसणे, अक्षय जोशी, प्रदिप मुंदडा, संदीप राहतेकर आनंद अजमेरे,आदींनी  या शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी कायदेतज्ञ ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड. शंतनु धोर्डे, ॲड. बाबासाहेब पानगव्हाणे, ॲड. सुयोग जगताप, ॲड. दिपक जाधव, संतोष भट्टड, प्रदिप मुंदडा, चेतन चव्हाण, यांच्यासह ५० बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. मयुरा वाळींबे पुढे बोलताना म्हणाल्या की, बांधकाम व्यावसायिकांनी यापुढे  ग्राहकांना गृहीत धरून नये. रेरा कायद्यामुळे नागरीक जागृत झाले असून. रेरा हा कायदा ग्राहकांच्या बाजुने शंभर टक्के आहे. 

 केवळ विक्रीसाठी बांधकाम करुन त्याची जाहिरात बाजी करत असाल तर सावधान रहा. बांधकाम व्यावसायिकांनी जे माहिती पञिकावर जी माहिती दिली त्या सर्व योजना पुर्ण कराव्या लागणार आहेत. राज्य शासनाने जे नियम तयार केले आहेत ते सर्वांना शिस्त लावण्यासाठी केला आहे. ज्या सुविधा सांगितल्या त्या दिल्याचं पाहिजेत.  बांधकाम व्यावसायिकांनी नियोजीत प्लॅन अचानक बदलुन सुविधा ग्राहकांना दिल्या तर त्या कायद्यानुसार चालणार नाही. रेराने परवानगी दिलेलाच प्लॅन करावा लागेल. त्यात बांधकाम व्यावसायिकांना बदलता येणार नाही. बांधकाम व्यवसायात पारदर्शकता येण्यासाठीच रेरा कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.

 यावेळी  क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक बोलताना म्हणाले की, रेरा कायदा काय आहे त्याचा बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्यांवर कसा परिणाम होतो. ग्राहक व बांधकाम व्यवसायिक यांच्यातील होणारा व्यवहार पारदर्शक कसा करता येतो यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. बिल्डर व ग्राहकांमध्ये कायमस्वरूपी सुसंवाद असणे अपेक्षित आहे. कोणीही  क्लिष्ट कायद्याच्या कचाट्यात अडकून चुकीचे काम होवू नये. कायद्याचे पालन सर्वांनी केले तर शहरातील बांधकामांची उंची अधिक डौलाने वाढेल. रेरा कायदा बिल्डर्स यांना समजला तरच ग्राहकांना समजावून सांगता येतो. तसेच शहराच्या विकासाला चालना देणारं हे शिबिर आहे असेही ते म्हणाले.

यावेळी उद्योजक राजेश ठोळे म्हणाले की, रेरा व महारेरा कायद्यामुळेग्राहकामध्ये जनजागृती होत असल्याने आपापसातील वाद कमी होत आहेत.   बांधकाम व्यवसायातील अनेक समस्या सुटत पारदर्शकता येत आहे.

 यावेळी कायदेतज्ञ ॲड शंतनु धोर्डे यांनीही उपस्थितांना विविध प्रश्न विचारुन कायद्यासंदर्भात सखोल चर्चा केली. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडून विचार मंथन केल्याने आगामी काळात कोपरगाव शिर्डी परिसरातील बांधकाम व्यवसायिक अधिक पारदर्शक काम करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.