कोपरगांव बाजार समिती निवडणुक बिपीनदादा कोल्हेंनी मानले मतदारांचे आभार 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ :  कोपरगांव विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीचे केंद्र असलेल्या कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांसह शेतक-यांनी एकमुखाने विश्वास व्यक्त करून सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्क्याने विजयी केले त्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मतदारांचे जाहिर आभार मानले असुन बाजार समितीच्या माध्यमांतुन शेतकरी विकासाला सर्वांना बरोबर घेवुन सर्वोच्च प्रधान्य देण्याचे जाहिर केले. 

Mypage

          त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आपसात मतभेद बाजुला ठेवुन शेतकरी विकासाला प्राधान्य देण्यांबाबत आपण सुरूवातीपासूनच विचार मांडला होता त्याला चांगल्याप्रमाणे यश देखील आले मात्र अंतिम टप्प्यात ही निवडणुक बिनविरोध होता होता राहिली.तरीही मतदार राजांने शेतकरी हित लक्षात घेवुन मतपेटीच्या माध्यमांतुन जो कौल दिला तो सर्वार्थाने योग्य असुन कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समिती व त्याअंतर्गत सुरू असलेला विकास असाच सर्वसंमतीने पुढे नेण्यासाठी अटोकाट प्रयत्न करू.

tml> Mypage

 शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेऊन ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणुन बाजार समिती हा महत्वाचा धागा आहे.शेतकरी,व्यापारी, उद्योजक,नागरिक यांच्या नियमित संपर्काचे माध्यम म्हणून बाजार समिती कार्यरत असते.निसर्गाचा लहरीपणा बघता शेतमाल खरेदी विक्री बाजार समितीत उत्तम रीतीने चालन्यासाठी कोपरगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते सहकार्य शिल असतील असा विश्वास आहे.ज्ञात अज्ञात मतदारांनी जो विश्वास दाखविला त्यांचे व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Mypage