कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. यात सेंट्रल कस्टम एक्साईजमध्ये पवन सुनील शिरसाट या विद्यार्थ्याला कॉन्स्टेबलपदी नियुक्ती मिळाली. तर रेश्मा रमजान शेख, अरबाज इब्राहिम शेख, अमोल शंकर थोरात, अनंत बबन पवार या विद्यार्थ्यांना पोलीसपदी नियुक्ती मिळाली आहे.
तसेच, गणेश सुनील वादगे या विद्यार्थ्यांची इंडियन नेव्हीत क्लर्कपदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून मिळालेली प्रेरणा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्यातील प्रा.संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन यांचा आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
हे यश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. रमेश सानप आणि सर्व प्राध्यापकांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.