शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव नगरपरिषदे मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून वाढ दिवस साजरा करण्यात आला.
वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, नगरपरिषदेचे माजी बाधंकाम सभापती कैलास तिजोरे, मुख्याधिकारी सचिन राऊत, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल यांच्या हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगरपरिषद कामगार संघटना प्रमुख रमेश खरात, उपाध्यक्ष सुरज मोहीते, राजूभाई काझी,राजू नाईक, देवदान कांबळे ,भानुदास गायकवाड, विष्णु तुजारे, सुरेश खडांगळे, शेख सलीम जिलानी, शामभाऊ शिंदे, संजय लांडे पाटील,शेख राजुभाई, कडु मगर, डॉ. दिलीप वाघमारे, रईस सौदागर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा .चव्हाण म्हणाले, आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वंचित उपेक्षित शोषित कष्टकरी शेतकरी कामगार या पिचलेल्या वर्गासाठी रस्त्यावर उतरून चळवळीत काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे. आदरणीय बाळासाहेब हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे व विचाराचे खरे वारसदार आहेत. देशातील मनुवादी व्यवस्थेला फक्त श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच थोपवू शकतात. आज सत्तरी ओंलाडुंनही तरुणाला लाजवेल असे कार्य ते करत आहेत. शेवगाव पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. प्यारेलाल शेख यांचेही भाषण झाले, राजु नाईक यांनी आभर मानले.