संजीवनीची अनुश्री बनकर ९८ . २० टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम – डॉ. मनाली कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : केंद्रिय माध्यमिक  शिक्षण  मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन-सीबीएसई) फेब्रुवारी फेब्रंवारी/मार्च २०२३ मध्ये इ.१० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन त्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी अकॅडमीच्या अनुश्री योगेश  बनकर हीने ९८.२० टक्के गुण मिळवुन कोपरगांव तालुक्यातील सर्व सीबाएसई पॅटर्नच्या शाळांमधुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाली.

या परीक्षेमध्ये संजीवनी अकॅडमीच्या १७ विध्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले आहे, तसेच १०० टक्के निकालाची परंपराही कायम राखली आहे, अशी  माहिती स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

          पत्रकात डॉ. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, हितेन समीर शाह  याने या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर मनस्वी विजय नरोडे हीनेे ९७ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. २९ विध्यार्थ्यानी  विध्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्यांपर्यंत गुण मिळविले तर २३ विध्यार्थ्यांनी ७० ते ७९ टक्यांपर्यंत गुण मिळविले. संजीवनी अकॅडमीची ही इ. १० वीची ६ वी तुकडी उत्तिर्ण झाली आहे. आपले पुर्वीचे किर्तीमान ओलांडून संजीवनी अकॅडमी नवीन किर्तीमान स्थापित करीत आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांची शिकवण असायची की पालक विश्वासाने  आपल्याकडे शिक्षणासाठी त्यांची पाल्ये दाखल करतात. त्यांची इच्छा असते की माझा पाल्य भविष्यात  बहुआयामी व्यक्तिमत्वाने विकसीत व्हावा. म्हणुन दर्जा आणि गुणवत्तेशी  कधीही तडजोड करायची नाही, अशी आचार संहिता घालुन दिली आहे. त्यांच्या विचारधारेनुसार संजीवनी अकॅडमीने केवळ शैक्षणिकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कोरले आहे, असे डॉ. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.

इ. १० वीत घवघवीत यश  मिळविलेल्या विध्यार्थ्याचा पाया हा नर्सरी शिक्षणापासुन ते इ. १० वीच्या परीक्षेपर्यंत अनेक शिक्षकांनी परीपुर्ण केला. म्हणुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व शिक्षकांचे तसेच प्राचार्या शैला  झुंजारराव या सर्वांचे अभिनंदन करून  सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. मनाली कोल्हे यांनी अनुश्री बनकर हिच्या घरी जावुन तिच्यासह वडील डॉ. योगेश  गंगाधर बनकर व आई डॉ. रेणुका योगेश  बनकर यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक आदित्य गायकवाड, कैलास ढमाले, शिक्षिका रेखा साळुंके व दिपाली गाडे उपस्थित होते.