आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमदार काळेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव मतदार संघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्चीतपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी कोपरगाव येथे अद्ययावत क्रीडासंकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव शहरातील के.बी.पी.विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर आ. आशुतोष काळे मित्रमंडळ, फ्रेंड्स क्रिकेट क्लब, श्री साई समर्थ प्रतिष्ठाण, साई सिटी क्रिकेट क्लब व माऊली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे (के.पी.एल.) उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
आमदार काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे क्रिकेट पर्व सुरू होत असून हि परंपरा यापुढे सुरु ठेवा. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे यामध्ये कोपरगाव तालुक्याचा देखील समावेश असावा हि माझी इच्छा आहे. त्यामुळे मतदार संघातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी माझे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
आय पी एल क्रिकेट स्पर्धा क्रिकेट रसिकांची पहिली पसंद आहे. या आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अष्टपैलू खेळाडू उदयास येत असून केपीएल स्पर्धा आयपीएल स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्तम माध्यम ठरणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त करून आयोजकांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.
याप्रसंगी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राजेंद्र कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, दिनकर खरे, अजीजशेख, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा, रहेमान कुरेशी, निलेश डांगे, रविंद्र सोनटक्के, सचिन गवारे, राजेंद्र बोरावके, राजेंद्र आभाळे, कलविंदरसिंग डडीयाल,
मनोज नरोडे, संतोष शेजवळ, रिंकेश खडांगळे, मुकुंद इंगळे, नितीन सोनवणे, डॉ. अच्युत कडलग, विशाल निकम, नवनाथ घुसळे, राकेश धाकतोडे, राजेंद्र नळे, पवन चिबडे, स्वप्नील आढाव, सुमित लोहाडे, तुषार बागरेचा, आनंद काळे, योगेश अमृतकर, काका वर्मा, अण्णा जंजिरे, नारायण नळे, नंदू कुऱ्हाडे, योगेश वाणी, संदीप सावतडकर, कुंदन भारंबे, रुपेश वाकचौरे, राहुल हंसवाल, निलेश सपकाळ, नितीन सोनवणे, हारूण शेख, शोएब शेख, आतिक पठाण, इम्रान पठाण, हसनई शेख, स्पर्धेचे आयोजक सोमनाथ आढाव, अनिरुद्ध काळे, अमोल गिरमे, संकेत पारखे आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.