शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ .जयंत पाटील यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यावर सूडबुद्धीने केलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर आज निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार राजेद्र दिवाण यांनी ते स्विकारले.
निवेदनात म्हटले आहे की, ईडी चा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ . जयंत पाटील यांना त्रास देऊन नाहक बदनामी करण्याचा प्रकार भाजप सरकारने चालवला आहे, तो अन्यायी आहे. असले प्रकार त्वरित थांबवायला हवेत.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे ताहेर पटेल, कमलेश लांडगे, प्रदिप काळे, मंगेश थोरात, युवराज भोसले, हनुमान पातकळ, मनोज तिवारी, संतोषराव धस, अमोल कराड, अनिल सरोदे, अभिषेक जगताप, गोविंदा किडमिंचे, क्रुष्णा मडके, आकाश जाधव, संजय घोडके, रोहीत पाटील, अतुल काळे, प्रभाकर बुचकुल, सचिन भारस्कर, बाबासाहेब काळे, किशोर सोंडे आदि पदाधिकारी आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.