श्रीगणेशचे १२ वी विज्ञान परीक्षेत १००% यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे तर्फे मार्च २०२३  मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी विज्ञान परीक्षेत श्रीगणेश शिक्षण संस्था को-हाळे संचलित श्रीगणेश ज्युनिअर कॉलेज,को-हाळे या कॉलेज चा निकाल सलग आठव्या वर्षी १००% लागला असून सर्वच विद्यार्थ्यानी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केलेले आहे.  

प्रांजल शेटे हिने ९०.१६ % गुण मिळवून प्रथम क्रमाक ,रिद्धी लहारे हिने ८९.५  % गुण मिळवून द्वितीय क्रमांक ,सिद्धेश  दवंगे याने  ८८.६६  % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी,सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ कामिनी शेटे, भारत शेटे, रविंद्र चौधरी, सुरेश गमे, देवीदास दळवी, महावीर शिंगवी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्नील लोढा, चिराग पटेल , आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य प्रा.रियाज शेख,उपप्राचार्य प्रा.प्रवीण दहे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी सत्कार केला.

          याचबरोबर निकालामध्ये १७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ९० विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ११५  विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. हिन्दी या विषयात ६ ,गणित मध्ये ७ ,जीवशास्त्र २ ,इंग्रजी ३ विद्यार्थ्यानी 90 गुणाच्या पूढे गुण तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये १९० गुणांच्या पुढे २ विद्यार्थ्यांनी गुण  मिळविले आहेत. 

या सर्व विद्यार्थ्यांना दोन वर्ष सातत्याने श्रीगणेश पॅटर्न अंतर्गत मार्गदर्शन केले गेले. या पॅटर्नमध्ये बोर्ड अभ्यासक्रमाबरोबर जे ई ई , नीट व महाराष्ट्र सीईटी  चा अभ्यासक्रम परिपूर्ण राबविला जातो. श्रीगणेश ज्युनिअर कॉलेजचे प्रा.योगेश फटांगरे ,प्रा.सागर हिंगे, प्रा.सुनील गोर्डे, प्रा.आहेर नंदलाल, प्रा.अमोल कोतकर, प्रा.सय्यद साहिल, प्रा.पूजा चांदगुडे, प्रा. ऋषिकेश आंत्रे, प्रा.गौरव लहामगे, प्रा.अमर शेख , प्रा. बाजीराव जावळे  यांचे मार्गदर्शन लाभले.

        श्री गणेश शैक्षणिक संकुलात संपूर्ण दोन वर्ष आयआयटी -जेईई मेन्स ची तयारी करून जेईई  परीक्षेत ९४.६८ % गुण व आयआयटी -जेईई मेन्स ची तयारी केल्यामुळे अगदी सहज रित्या बोर्ड परीक्षेत ९०.१६% गुण मिळाले. “श्री गणेश पॅटर्न” मुळे हे यश मला प्राप्त झाले. – कु . प्रांजल शेटे (विद्यार्थिनी)