कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी एकरकमी हजारो कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्यामुळे चातकाप्रमाने निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुखावणारा आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला निळवंडे कालव्यांचा प्रश्न सुटल्यामुळे दुष्काळी भाग हरित होणार याचा आत्मिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
निळवंडे कालव्यांची कामे रेंगाळत पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. आ. आशुतोष काळे यांनी अनेक वेळा निळवंडे कालवा कृती समितीचे सदस्य व लाभधारक शेतकऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निळवंडे कालव्यांना निधी मिळावा यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री आ.जयंतरावजी पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ना. जयंतराव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेवून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी निळवंडे कालव्यांसाठी भरघोस निधीची तरतूद केली.
त्यामुळे निळवंडे कालव्यांमध्ये पाणी वाहतांना दिसत असून याचा लाभधारक शेतकऱ्यांना अत्यानंद झाला आहे. या आनंदात आ. आशुतोष काळे यांना सहभागी करून घेवून महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडी सरकारप्रती आभार व्यक्त करण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वाकडी येथे लाभधारक शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते निळवंडे कालव्याच्या पाण्याचे जलपूजन केले.
याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, निळवंडेच्या निर्मितीनंतर कालव्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कालव्यांसाठी जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न केले. माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील पाठपुरावा केला होता व मला देखील यामध्ये खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान वाटते.
निळवंडे धरणाच्या उर्ध्वप्रवरा डावा अंत्य कालव्याच्या १४.५०० किलोमीटर पैकी १२.८०० किलोमीटर पर्यंत वाकडी, खंडाळा, श्रीरामपूर परिसरात पाणी पोहोचले आहे. यापुढील काळात चाऱ्यांचे अस्तरीकरण, बंदिस्त पाईपलाईन वितरण प्रणाली आदी कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. तो निधी लवकरात लवकर कसा उपलब्ध होईल यासाठी पाठपुरावा करून लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, निळवंडे कालवे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, तालुकाध्यक्ष जालिंदर लांडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विजयराव ढोकचौळे, समन्वयक संजय एलम, प्रभाकर एलम, संघटक मच्छिन्द्र एलम, रावसाहेब गाढवे, सुनील खटके, गणेश लहारे, आण्णासाहेब कोते, सोपानकाका वाघ, सुरेश वाघ, मुरलीधर शेळके, विठ्ठल शेळके, अनिल रक्टे, उपसरपंच कारभारी बोंडे, नानासाहेब कोते,
भाऊसाहेब लहारे, राजु कोते, किशोर कोते, दिनेश जगताप, दीपक वाघ, नितीन वाकचौरे, सुरेश लहारे, दीपक वेताळ, दत्तात्रय लांडे, गोकुळ लांडे, किशोर कोते, कारभारी भोंडे, विनायक देठे, विजय सदाफळ, दत्तात्रय लांडे, गोकुळ लांडे, गणेश लहारे, वाल्मिक लहारे, पोपट पानसरे, कैलास पानसरे, राजेंद्र कोते, दिंगबर कोते, जालिंदर कोते, अल्ताफ तांबोळी, प्रसाद लांडे, दिलीप गोरे, रावसाहेब जाधव, अशोक लांडे, विष्णू कोते, आकाश लांडे,