कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई ने राज्यातील पाॅलीटेक्निक्सच्या मे-जुन, २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असुन प्रत्येक वर्षाच्या सम आणि विषम सत्रांचे एकत्रित निकालही जाहिर केले. यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी शाखेतील क्रिश भरत पोरवालने शेकडा ९६.४० टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवित सर्व शाखांमधुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे असुन कंसातील आकडे शेकडा गुण दर्शवितात तसेच शाखा व वर्ष निहाय गुणानुक्रमाचाही उल्लेख आहे.
अंतिम वर्ष (तिसरे)-काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजीः क्रिश भरत पोरवाल (९६. ४० प्रथम), प्रतिक्षा बाळासाहेब चांदर (९४. ८६ द्वीतिय) व आयुष उध्दव ससाणे (९३. ८३ तृतिय).मेकॅट्राॅनिक्सः यशश्री हरेष चौधरी (९५. ८५ प्रथम), रितेश सोमनाथ औताडे (९४. ५२ द्वीतिय) व जागृती किशोर शेळके (९३. ४१).सिव्हिल इंजिनिअरींगः सुहानी वसंत सोमासे (८९. ९५ प्रथम), श्रेया अरूण कुलकर्णी (८७. ३७ द्वीतिय) व अनुजा निलेश सांगळे (८६. ३२ तृतिय).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगः चैतन्य राजाराम खरात (८७. ५६ प्रथम), हर्षदा संतोष पवार (८६. ९४ द्वीतिय) व सोहम खुशालचंद विसपुते (८५. ५६ तृतिय).मेकॅनिकल इंजिनिअरींगः पुर्वा अनिल भोंगळे (८२. ९७ प्रथम), मंगेश राजेंद्र लव्हाळे (८२. ८७ द्वीतिय) व शिवम रमेश देवकर (८२. ४६ तृतिय)
दुसरे वर्ष – काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजीः प्राजक्ता विलास औताडे (९२. १३ प्रथम), दुर्गा बाबासाहेब आसणे (९१. ३३ द्वीतिय) व राजेश्वरी रोहीदास दौंड (९०. ८०0 तृतिय).. मेकॅट्राॅनिक्सः आकांशा रूपेश नागपुरे (८८. ८६ प्रथम), भक्ती दत्तु गोसावी (८८. ८१ द्वीतिय) व मयुरी सुरींदर वाबळे (८८. १६ तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींगः वरूण रविंद्र चौधरी (९२. ११प्रथम), हर्षल किशोर परजणे (९१. ४८ द्वीतिय) व चेतन संजय गायकवाड (८०. ८१ तृतिय).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगः शुभम संजय कातकडे (८७. ४७ प्रथम), सिध्दी गणेश वाघचौरे (८६. ५३ द्वीतिय) व लीना अजय भोई (८५. ८७ तृतिय).मेकॅनिकल इंजिनिअरींगः संजना घनशाम चांदर (८६. १७ प्रथम), पद्मश्री प्रशांत बोळीज (८१. ३१ द्वीतिय) व सौरभ बाळासाहेब चौधरी (७९. २६ तृतिय).
प्रथम वर्ष – काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजीः श्रावणी उमेश गायकवाड (९१. ६६ प्रथम), साईतेज संदिप वाबळे (८९. ८६ द्वीतिय) व वेदांत राजेंद्र भाकरे (८८. ८० 0 तृतिय). मेकॅट्राॅनिक्सः अनुष्का संतोष ससाणे (८९. १० प्रथम), निकिता प्रदिप बोऱ्हाडे (८५. ४५ द्वीतिय) व सुमित मनोज जगझाप (८४. ७६ तृतिय).सिव्हिल इंजिनिअरींगः प्रसाद हेमंत वाघ (८४. ५४ प्रथम), क्षितिजा सुभाष हराळे (८१. ५१ द्वीतिय) व आस्मा सुनिल तडवी (८०. ३० तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगः अजय बाबासाहेब मापारी (७८. ५३ प्रथम), संयोगीता सर्जेराव वल्टे (७८. २६ द्वीतिय) व श्रेयश संतोष शिंदे (७७. ८० तृतिय). मेकॅनिकल इंजिनिअरींगः प्रिती विजय नाईकवाडी (८४. ९० प्रथम), पायल योगेश धोंडलकर (८१. ९३ द्वीतिय) व प्राची बाबासाहेब नवले (८०. ६९ तृतिय).
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी अंतिम वर्षातील प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य व विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही गुणवंतांचे अभिनंदन केले.