सद्गुरू माऊलींचे कार्य म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडातील सर्वश्रेष्ठ दानी कार्य  – संत परमानंद महाराज

 आत्मा मालिक ध्यानपिठात गुरूपौर्णिमा सोहळ्यात लाखो भाविकांनी घेतले सद्गुरू माऊलींचे दर्शन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ :  संपूर्ण ब्रम्हांडात सर्वश्रेष्ठ दानी कोण असेल तर तो म्हणजे ब्रह्म पुरुष अर्थात सद्गुरू माऊली आहेत. असे विचार आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष  व आत्मा मालिक ध्यान पिठाचे  संत परमानंद महाराज यांनी व्यक्त केले. तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यान पिठात प्रतिवर्षाप्रमाणे गुरूपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन १ जुलै ते ३ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात आले होते. संपूर्ण विश्वाला आत्मज्ञानाचे महत्व पटवून देत ‘सबका मालीक आत्मा’ हा संदेश देणारे आत्मा मालिक ध्यानपिठाचे प्रमुख आत्मा मालीक माऊलींच्या दर्शनासाठी लाखो आत्मप्रेमींचा जनसागर लोटला होता.

या गुरुपौर्णिमेच्या उत्सवा निमित्ताने देश विदेशातील लाखो आत्मप्रेमी भाविकांनी आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. तीन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या लाखो भाविकांसाठी भोजन, निवासासह सर्व सुविधा ध्यानपिठाच्या वतीने मोफत पुरविण्यात आल्या होत्या. ३ जुलैच्या पहाटे सद्गुरू माऊलींचं विधीवत पुजन करुन त्यांच्या हस्तलिखित ‘आत्म योग’ हा  ग्रंथ सर्वांना अभ्यासासाठी अर्पित करण्यात आला.

यावेळी उपस्थित आत्मप्रेमी भावीकांशी संवाद साधताना संत परमानंद महाराज म्हणाले की, व्यास मुनी पासून सांगितले आहे की, व्यास पौर्णिमेला  प्रत्येक साधकाने आपल्या सद्गुरू स्थानावर  येवुन त्यांच्या चरणी आपलं तन,मन,धन अर्पित करून कृतज्ञता व्यक्त करायची असते.आपण दिलेलं दान काही काळात संपुष्टात येत माञ सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च दात्याने दिलंल दान हे शाश्वत असतं. त्यांच्या जवळ आलेल्या प्रत्येकांच्या झोळीत जे दान टाकतो ते काही नाश पावत नाही. हेच शाश्वत दान निर्गुण निराकार ब्रम्हाचं अर्थात सद्गुरू माऊलींचं आहे.

कोकमठाच्या क्षितिजावर आत्मप्राप्तीची जन्मोजन्मीची अनंत काळापर्यंत वर्णी लागणार आहे. गुरुमाऊलींनी आजीवन विश्वकार्याची सेवा केल्याने  गुरुमाऊलींनी सिद्ध केलेला ‘आत्मा योग’ पंचमवेध हा ग्रंथ अखिल विश्वात्मक कार्यासाठी अर्पित केला आहे. आजपर्यंत गुरुमाऊलींकडून जीवनाचा खरा मंञ मिळाला होता. ध्यानचं तंञ देखील दिलं होतं आता विश्वात्मक परिवारासाठी माऊलींनी ग्रंथ दिल्याने गुरूपौर्णिमेच्या महापर्वाचा हा ञिवेणी प्रसाद दिला आहे.

गेली आठ दशकं माऊली वृत्तस्थ आहेत. त्यांनी अनेक संतांना, भक्तांना वृत देवून अभ्यास करुन घेतला. त्यांचे हे कार्य एका शतका पुरते नसुन अनंत काळापर्यंत चालणारे आहे. आत्मप्राप्तीची परंपरा पुढे चालु रहावी म्हणून गुरुमाऊलींनी आत्मयोग या ग्रंथाची निर्मिती केली आहे. यापुर्वी लिखित ग्रंथ नव्हता. आपल्याकडे माऊलींच चालता बोलता पंचमवेध होता. गुरुमाऊलींच उभं आयुष्य उभी ओवी होती. ती प्रत्येकांनी अनुभवली वाचली, इथुन पुढे ग्रंथातुन  गुरूमाऊलींचे बोल पिढ्यानपिढ्या अभ्यासले जातील भावी पिढीसाठी अनंत काळासाठी यांची वर्णी लागणार आहे.

आपण सगळीकडे हरलो पण या हरिने आपल्याला स्वीकारलं. अर्थात हरण्यामध्ये सुध्दा त्यांची हरिगिरी लपलेली होती. कारण आपल्या आत्म्यांच आरोहळ दडलेलं होतं ते शक्य केलं  या हरिने. त्यांनी आपल्याला स्वीकारलं म्हणुनच आत्मज्ञानाचा प्रसाद या कलियुगात मिळाला असे म्हणत संत परमानंद महाराज यांनी उपस्थित भाविकांना उपदेश केला. 

 या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंञी प्रकाशभाई  मेहता यांनी आत्मस्वरूपाचे पादूका घेवून आले होते. त्याचे पुजन गुरूमाऊलींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रकाश भाई मेहता यांनी गुरुमाऊलींचे मनोभावे पुजन करुन दर्शन घेतले. या कार्यक्रमाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विषेश उपस्थिती लावून सपत्नीक दर्शन घेतले.  यावेळी आत्मा मालिक ध्यानपिठाचे संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत राजनंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज संत प्रभावती माई संत स्मृतीमाई, आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे विश्वस्त  बाळासाहेब गोरडे  प्रकाश भट, प्रकाश गिरमे, प्रभाकर जमदाडे, विठ्ठलराव होन, विलास पाटील, माधवराव देशमुख, सुरेखा मोहिते, कमलताई पिचड, विष्णुपंत पवार, उमेश जाधव उदय शिंदे, पावशिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुपौर्णिमेच्या व्यवस्थेत व सेवेसाठी आत्मा मालिक  शैक्षणिक संकुलाचे सुधाकर मलिक, यांच्यासह  सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी भाविक यांनी मोलाचे योगदान दिले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात ध्यान पिठाच्या भजनी मंडळी सह इतर ठिकाणांहून आलेल्या भजनी  मंडळींनी भजणातुन आपली सेवा करीत माऊलींच्या प्रती गुरुभक्ती अर्पित केली. तर देशभरातील अनेक सत्संग मंडळांनी विश्वात्मक कार्यात सहभाग घेवून गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याची रंगत वाढवली.