सावली दिव्यांग संघटनेचे भिक मागो आंदोलन
शेवगाव प्रतिनीधी, दि. ४ : रोजगार हमी योजनेमध्ये पात्र दिव्यांगाना रोजगार देण्याचे आदेश असतांनाही मागणी करूनही दिव्यांगांना काम दिले गेले नाही. तसेच काम न दिल्याने बेरोजगार भत्ता मागणी करुनही मिळत नसल्याने शेवगाव तालुक्यातील दिव्यांग मेटाकुटीला आल्याने सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव शहरामध्ये भिक मागो आंदोलन करून गांधीगिरी केली. भिक मागो आंदोलनाची सुरूवात घोषणा देत शेवगाव तहसील कार्यालयापासुन बाजारपेठ मार्गे पंचायत समिती करण्यात आली.
यावेळी सावली दिव्याग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी, प्रशासकीय धोणाविषयी दिव्यांगाच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या . शासनाच्या निष्क्रीयतेमुळे दिव्यांगाना भिक मागण्याची वेळ आली. शासन दिव्यांगाच्या दारी हे अभियान फक्त गाजर दिखाव असुन दिव्यांगाना फक्त आशेवर ठेवण्याचे काम शासनाकडुन होत असल्याची त्यांनी टीका केली.
दरम्यान दिव्यांगांनी भिक्षा मागो आंदोलनातुन भीक मागून २७० रुपये भिक्षा जमली असून ही रक्कम शासनाचा निषेध म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठविली जाणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तहसीलदार राहुल गुरव व गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी दिव्यांगाना काम देणेसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, मनोहर मराठे, खलील शेख, अनिल विघ्ने, गोवर्धन वांढेकर, शाम गुठे, शिवाजी आहेर, सुदाम माताडे, एकनाथ धाने, सुनिल वाळके, नंदकिशोर चिंतामणी, बबन गव्हाणे, सकू मिसाळ, सुरेखा गायकवाड, मिना ससाने, हिराबाई मिसाळ, वदंना तुजारे यांच्यासह अनेक दिव्यांग उपस्थीत होते.