कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : कोपरगाव आणि राहता तालुक्यातील कोल्हे गटाकडे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दलित सुधार योजनेचा निधीची अडवणूक करून कोपरगाव तालुक्याचे सेनापती आ.आशुतोष काळे व जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून राजा झालेले ना. राधाकृष्ण विखे या दोघानी मिळून दलीतांवर अन्याय केला असल्याचा घणाघात आंबेडकरी चळवळीचे नेते जितेंद्र रणशूर यांनी केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील दलित समाज्याच्या सुधार योजनेचा निधीची अडवणूक करणाऱ्या पालकमंत्री व आमदार यांच्या निषेधार्थ शिर्डीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा नेते विवेक कोल्हे नेतृत्वात काढण्यात आला होता. यादरम्यान रणशुर यांनी तोफ डागली.
आंबेडकरी चळवळीचे नेते जितेंद्र रणशूर म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. हजारो कार्यकर्ते कोपरगावच्या प्रथम महिला आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. त्यामुळे शासन आमचही आहे ही त्यांची भावना असताना देखील विखे यांच्या वागणुकीने आम्हाला मोर्चा काढावा लागतो. मात्र, शासन जरी आमचे असले तरी शासनातले पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आ. आशुतोष काळे हे लोक आमचे नाहीत ही जनभावना आहे.
हे लोक जाणून बुजून अन्याय करत असतील तर आगामी काळात आंबेडकरी जनता यांना धडा शिकवणार आहे. निधी बाबत हे दोघे दुजाभाव करतात. दोघे मिळून तालुक्यावर अन्याय करतात. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनखाली असणाऱ्या ग्रामपंचयातीचा दलित सुधार योजनेच्या निधीत दुजाभाव केला जातो. त्यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती कोल्हे गटाकडे आल्या असतील त्या ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा कोल्हेवर विश्वास आहे.
विखे कुटुंबाच्या मनमानी आणि दडपशाही विरोधात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने जनतेने रौद्र रूप घेतल्याने त्यांचा तोल जातो आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इतिहासात लिहले जाईल की कोल्हे यांनी जनतेचा आवाज सर्वप्रथम पोहचविला अशी भावना जनतेची झाली आहे.
बंद पडलेला गणेश कारखाना कोल्हे यांनी चालू केला. पुढे रनशूर म्हणाले कि, गॅरंटीचे पहिले नरेंद्र मोदी असतील तर दुसर नाव विवेक कोल्हे आहे. येत्या काळात ज्या पालकमंत्री यांनी दुजाभाव केला. त्यांना कोपरगावात काळे झेंडे दाखविणार आहोत. तर तालुक्याचे आमदार यांचे शेवटचे सहा महीने राहिले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे जितेंद्र रणशूर म्हणाले.
संदीप देवकर आपल्या भाषणात म्हणाले की, निधी वाटपात दुजाभाव झाला आहे. मात्र, शासनाचा गायगोठा यांच्याच कार्यकर्त्याना मंजूर होतो, आमदारांच्याच कृपेने जवळच्या घरातच गोठे मंजूर झाले आहेत. अर्जुन काळे नामक आमदारांच्या घरातील उपसभापती पदाचा कार्यकाळ संपलेला व्यक्ती सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पंचायत समितीत काय करत असतो ? याचा खुलासा लवकरच होईल. विखेंचे आता अनेक अन्याय झाले त्याचे उत्तर त्यांना गणेश कारखाना निवडणुक व साईबाबा संस्थानची कामगार सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला.
त्याचा राग मनात धरून गलीच्छ पद्धतीचे राजकारण करायचे. या मुळे आता आमच्या तालुक्यातील दलित आदिवासी बांधवांकडे मत मागायला जाऊ नका, नाहीतर लोक आता तुम्हाला काढून देतील अशी वागणूक तुम्ही दिली आहे. दलित सुधार योजनेत आमच्या गावातील कामे झालेली नाहीत. त्यामुळे ते लोक आता घरपट्टी व पाणी पट्टी भरत नाही कारण त्यांना भारतीय नागरिक म्हणून हक्काच्या सुविधा विखे आणि आमदार काळे यांच्यामुळे मिळत नाही हे दुर्दैव आहे असे देवकर आपल्या भाषणात म्हणाले.