राजकीय वजन वापरून कोपरगावकरांचा भार हलका – आमदर काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगावकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करतांना सर्व सामान्य कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास पण करायचा व कोपरगावकरांवर अतिरिक्त कराचा बोजा देखील पडू द्यायचा नाही अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडून आ. आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी नगरविकास विभागाकडून मिळवून दिला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची भीष्म प्रतिज्ञा आ. आशुतोष काळे यांनी करून ती प्रतिज्ञा सत्यात उतरविण्यासाठी निवडून आल्यापासून त्यांचे अथक प्रयत्न सुरु होते. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याचा बरोबर फायदा उचलून त्यांनी ५ नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील कामास निवडून आल्यापासून तीनच महिन्यात प्रारंभ करून निवडणुकीत आश्वासन फक्त द्यायची नसतात तर ती आश्वासन पूर्ण देखील करायची असतात हे कोपरगावकरांना दाखवून दिले होते. 

५ नंबर साठवण तलाव वितरण व्यवस्थेसाठी कोपरगाव नगरपरिषदेला द्यावा लागणारा. १५ टक्के म्हणजेच जवळपास २० कोटी निधी महायुती शासनाने दिला व कोपरगाव शहराबरोबरच शहरालगत असणाऱ्या विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या भागातील विकासासाठी दिलेला १० कोटी निधी मी करीत असलेला पाठपुरावा, प्रामाणिक प्रयत्न व कोपरगावकरांच्या आशीर्वादाचे फलित असून हि कोपरगावकरांना नवीन वर्षाची भेट आहे.-आमदार काळे.

प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण होताच पुढील कामाला वेग देण्यासाठी लवकरात लवकर निधी कसा पदरात पाडून घ्यायचा यासाठी त्यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून नगरविकास खात्याला अक्षरशः हैराण करून सोडले होते. त्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याची नगरविकास खात्याने दखल घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी १३१.२४ कोटी निधी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला होता. मिळालेल्या निधीतून ५ नंबर साठवण तलावाचे काम आज रोजी प्रगतीपथावर आहे.

या कामाकडे आ. आशुतोष काळे यांचे बारीक लक्ष असून पुढील वर्षी काम पूर्ण होताच कोपरगावकरांना नियमित व स्वच्छ देण्याचे आ. त्यांनी सांगितले आहे. मात्र, ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी देतांना त्यापैकी १५ टक्के निधी म्हणजेच जवळपास २० कोटी निधी हा कोपरगाव नगरपरिषदेला देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे या २० कोटीचा बोजा सर्वसामान्य कोपरगावकरांवर पडणार होता. परंतु साठवण तलाव पण करायचा व २० कोटीचा बोजा सर्वसामान्य कोपरगाव करांवर पडू द्यायचा नाही.

यासाठी  आ. आशुतोष काळे मागील तीन वर्षापासून करीत असलेल्या निस्वार्थी प्रयत्नांना कोपरगावकरांच्या आशीर्वादाने मोठे यश मिळाले असून नगरविकास विभागाने कोपरगाव नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगावकरांचा भार हलका झाल्यामुळे समस्त कोपरगावकरांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने जवळपास २० कोटी निधी दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांचे समस्त कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.