शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगावात कायदा व सुव्यवस्था आबाधीतआहे हा विश्वास जनतेला देण्यासाठीआज शुक्रवारी (दि. २१ ) दुपारी शेवगाव शहरातील क्रांती चौक-शिवाजी चौक-भगतसिंग चौक -नाईकवाडी मोह्हला-वडारगल्ली-मोची गल्ली-आंबेडकर चौक-क्रांती चौक ते शेवगाव पोलीस स्टेशन दरम्यान रॅपीड ॲक्श़न फोर्सचे अधिकारी व जवान तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पथ संचलन केले.
सदर संचलनात रॅपीड एक्श़न फोर्स नवी मुंबईचे प्लाटुन जतीन किशोर (समादेशक १०२ बटालियन), डिप्टी कमांडेंट आलोक कुमार झा, पोलीस निरीक्षक सुशील कुमार, पोलीस निरीक्षक एल.अशाहारी व अर्चना कुमारी, ५ पोलीस उपनिरीक्षक, ७ सहाय्य़क उपनिरीक्षक, ४६ जवान सहभागी होते. तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी सुनील पाटील, शेवगाव पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी बी.चद्रकांत रेड्डी व इतर अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांचे उपस्थितीत संचलन पार पडले.